३१ जुलै १९९५ चा तो ऐतिहासिक दिवस होता. याच दिवशी देशात पहिला मोबाईल कॉल करण्यात आला. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकातातून दिल्लीत केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल कॉल केला होता.
कोणत्या कंपनीचा मोबाईल वापरला?हा कॉल करण्यासाठी नोकियाचा हँडसेट वापरला होता, तर सुखराम यांनीही नोकियाच्याच मोबाईलचा वापर केला होता. पहिला कॉल करण्यासाठी नेटवर्क ‘मोदी टेल्स्ट्रा’चे होते, याचे नाव ‘मोबाइलनेट’ असे होते, ही नेटवर्क सेवा भारताच्या बीके मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियाच्या टेल्स्ट्रा यांच्यातील संयुक्त उपक्रम होता.
न परवडणारा होता मोबाईल ‘मोदी टेल्स्ट्रा’ची नंतर स्पाइस नावाने सेवा सुरू झाली. रिपोर्ट्नुसार, सुरुवातीच्या काळात फोन कॉलचे दर आउटगोइंग आणि इनकमिंग दोन्हीसाठी रुपये ८.४ प्रति मिनिट होते; पण, सर्वाधिक मोबाईल ट्रॅफिकच्या वेळेत, प्रति मिनिट १६.८ रुपये मोजावे लागायचे. त्यावेळी मोबाईल फोन खरेदी करणेही परवडणारे नव्हते. तेव्हा साध्या मोबाईल फोनची किंमतही ४०,००० रुपयांपेक्षा जास्त असायची; पण सध्याची परिस्थिती पूर्णतः भिन्न आहे. आता गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतोच, किंबहुना मोबाईल आता लोकांची गरज बनलाय.