अलीकडे सोशल मीडियाच्या काळात लोकप्रियता मोजण्याचे एक नवे परिमाण जगाच्या हाती लागले आहे ते म्हणजे ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या ! विशेषतः जागतिक नेत्यांमध्ये कोणाचे किती फॉलोअर्स आहेत, याची चाचपणी सतत होत असते. सात एप्रिल रोजीच्या हिशेबानुसार ट्विटरवरील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा. त्यांचे ट्विटरवर तब्बल १३१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. टॉप १०च्या या यादीत ७७.७ दशलक्ष फॉलोअर्ससह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्थान नववे आहे. विशेष म्हणजे बराक ओबामा, नरेंद्र मोदी आणि इलॉन मस्कवगळता उर्वरित सगळे मनोरंजन क्षेत्रातले आहेत!
Top 10 Most Popular on Twitter
बराक ओबामा - १३१.४ दशलक्ष जस्टीन बिबर- ११४.३ दशलक्ष केटी पेरी - १०८.८ दशलक्ष रिहाना - १०५.९ दशलक्ष क्रिस्टियानो - ९८.८ दशलक्षटेलर स्वीफ्ट - ९०.३ दशलक्ष लेडी गागा - ८४.५ दशलक्ष इलॉन मस्क - ८१ दशलक्षनरेंद्र मोदी - ७७.७ दशलक्षएलन - ७७.५ दशलक्षसंदर्भ : वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स