तुम्ही तुमचा लॅपटॉप किंवा कंप्यूटर बिघडल्यावर तुमच्या आयटी टीम, टेक कंपनीच्या कस्टमर सपोर्ट किंवा टेक्नॉलॉजीची माहिती असलेल्या मित्राला कॉल करता. अशावेळी हे तिघेही एक प्रश्न विचारतात, “बंद करून पुन्हा सुरु करून बघितला का?” आणि बऱ्याचदा या छोट्याश्या उपायामुळे तुमचा लॅपटॉप चांगला चालू देखील लागतो. ही कोणती जादू आहे का?
नेमकं लॅपटॉप किंवा कंप्यूटर रिबूट केल्यावर काय होतं?
रिबूट केल्यावर तुमच्या कम्प्युटरमधील सॉफ्टवेयर सध्याची स्थिती क्लियर करतो आणि सर्वकाही नव्यानं सुरु होतं. जर तुम्हाला एखादी एरर स्क्रीन दिसली तर कदाचित रिबूटमुळे तो एरर जाऊ शकतो. विंडोजची ब्लु एरर स्क्रीन लो लेव्हल एरर्समुळे येते आणि जेव्हा तुम्ही रिस्टार्ट करता तेव्हा प्रोग्राम कोड बऱ्याचदा पुन्हा नव्याने सुरु होतो.
जेव्हा तुमचा कंप्यूटर स्लो होतो, तेव्हा रिस्टार्ट केल्यानं तो फास्ट होतो. कारण अनेक कंप्युटर्स मेमरी लीकमुळे स्लो होतात. जेव्हा बॅकग्राऊंडमध्ये सुरु असलेला प्रोग्राम उपलब्ध असलेली मेमरी वापरतो, तेव्हा मेमरी कमी पडल्यामुळे कंप्यूटर स्लो होतो. रिस्टार्ट केल्यावर ही मेमरी क्लीन होते आणि पुन्हा कंप्यूटर पुर्वव्रत होतो.
काही रोजच्या वापरातील समस्या रिबूटमुळे ठीक होऊ शकतात. यात स्लो कंप्यूटर, अडकलेली स्क्रीन, एरर स्क्रीन, बंद पडलेलं वायफाय इत्यादी समस्यांचा समावेश यात होतो.
रिबूटचे अन्य फायदे
फक्त कंप्यूटर किंवा लॅपटॉप रिबूटमुळे ठीक होतात असं नाही. तुमचा स्मार्टफोन, मोडेम, राऊटर, स्मार्ट टीव्ही इत्यादी डिवाइसेजवरील सॉफ्टवेयर संबंधित समस्या देखील रिबूटमुळे ठीक होऊ शकतात. परंतु डिवाइस रिबूट करण्यापूर्वी तुम्ही काम करत असलेली फाईल सेव्ह करायला विसरू नका.
हे देखील वाचा:
- Amazon Sale: फक्त 449 रुपयांमध्ये दमदार 5G Smartphone; सॅमसंग, रेडमी आणि ओप्पो फोन्सचा समावेश
- छोट्याश्या कंपनीनं दिली आयफोनला मात! 10000mAh च्या राक्षसी बॅटरीसह भक्कम स्मार्टफोनची एंट्री
- मोफत iPhone 13! छोटंसं काम करून 80 हजारांचा आयफोन जिंकण्याची संधी, अशी आहे ऑफर