सामान्य लोक आपल्या बजेटमध्ये बसेल असा स्मार्टफोन शोधतात आणि तो वापरतात. परंतु जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असेलेले मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स कोणता फोन वापरतात? त्यांची स्वतःची कंपनी देखील स्मार्टफोन बनवत असताना ते अँड्रॉइडला का पसंती देतात? या प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात मिळणार आहोत.
अलीकडेच गेट्स यांनी सांगितलं की, मायक्रोसॉफ्टचे मालक कंपनीच्या सरफेस डुओच्या ऐवजी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 3 स्मार्टफोन वापरतात. विशेष म्हणजे या दोन्ही फोन्सचा फॉर्म फॅक्टर सारखाच आहे. 9To5Google च्या रिपोर्टनुसार, या आठवड्याच्या रेडिट एएमएमध्ये स्वतः गेट्स यांनी ही माहिती दिली आहे. पुढे त्यांनी आपल्या कंपनीच्या स्मार्टफोन टाळण्याचं कारण देखील सांगितलं आहे.
गेट्स यांनी सांगितलं की, “माझ्याकडे अँड्रॉइड Galaxy Z Fold 3 आहे. मी अनेक फोन्स वापरून बघत आहे. परंतु या स्क्रीनसह, मी एका चांगल्या पोर्टेबल पीसी आणि फोनसह काम करू शकतो दुसरं काही नाही.” रिपोर्टनुसार, सॅमसंगमध्ये मायक्रोसॉफ्टचे अॅप्स दोन्ही कंपन्यांच्या भागेदारीमुळे प्री-इन्स्टॉल्ड मिळतात, त्यामुळे देखील ते सॅमसंगला पसंती देत असावेत.
याआधी देखील, गेट्स यांनी ते अॅप्पल ऐवजी अँड्रॉइड वापरण्यामागचं कारण सांगितलं होतं. आता त्यांनी ते वापरत असलेल्या खास मॉडेलची माहिती दिली आहे. 2021 मध्ये, क्लबहाउसला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की अँड्रॉइड कंपन्या मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेयर प्री-इंस्टॉल करतात, तसेच अँड्रॉइड iOS च्या तुलनेत जास्त लवचिक आहे.