शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

मोबाईलवर अडल्ट जाहिराती किंवा नोटिफिकेशन का येतात? तुम्हीच कारणीभूत आहात, ते कसे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 20:20 IST

तुमच्या मोबाईलवर अडल्ट अॅड्स येतात? गूगल अशा जाहिराती पाठवत नाही, मग अशा जाहिराती का येतात...

स्मार्टफोन आणि इंटरनेटचे जग वाटते तितके सोपे नाही. प्रत्येक क्षणी आपल्यावर पाळत ठेवलेली असते. प्रत्येक वेळी तुमची हेरगिरी करणे हाच या मागचा उद्देश नसतो, पण बऱ्यावेळा आपल्या खासगी गोष्टी ऐकल्या-पाहिल्या जातात. अनेक लोक तक्रार करतात की, त्यांना फोनमध्ये अडल्ट जाहिराती किंवा सेक्शुअल कंटेंटचे नोटिफिकेशन येत आहे.

Google किंवा इतर अॅप्स तुम्हाला अशाप्रकारचे नोटिफिकेशन पाठवतात का? असं अजिबात नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, Google आणि इतर अॅप्स तुम्हाला तुमच्या वापरानुसार जाहिराती दाखवतात. म्हणजेच तुमच्या वागण्यातून किंवा मोबाईलच्या वापरातून, तुमचा अशा आशयाकडे कल असल्याचे समजते.

अडल्ट अॅड्स का दिसतात?Google किंवा Facebook सारख्या इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहता त्या जाहिराती अल्गोरिदम फॉलो करतात. हे अल्गोरिदम युजरची निवड, मीडिया वापर आणि पसंतीवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, तुम्ही अनावधानाने किंवा स्वेच्छेने अडल्ट वेबसाइट पाहिली असेल, तर नंतर तुमचा डिव्हाइस त्याच्या अल्गोरिदममध्ये तशाच प्रकारचे अपडेट करतो आणि तुम्हाला अशा जाहिराती दिसू लागतात.

इंस्टाग्राम रील्स ते यूट्यूब अशा प्रकारे काम करतातहे अल्गोरिदम तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींसाठीच नाही, तर तुम्ही सोशल मीडियावर पाहता त्या चांगल्या वाईट कंटेंटवरही काम करते. काही लोक तक्रार करतात, त्यांनना एकाच प्रकारच्या रील किंवा सोशल मीडिया पोस्ट दिसतात. याचे कारण म्हणझे, तुम्ही यापूर्वी तशा प्रकारचा कंटेट पाहिलेला असतो. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार पाहता, तशा प्रकारचा कंटेट तुम्हाला दिसतो. 

नोटिफिकेशन्स का येतात?तुमच्याकडे येणारे काही नोटिफिकेशन्स Google किंवा Chrome वरून येतात. हे तुमच्या सर्चवर आधारित असतात, तर नोटिफिकेशन तुम्हाला वेबसाइटवरुन पाठवले जातात. तुम्हाला अडल्ट अॅड्स किंवा नोटिफिकेशन मिळत असतील, तर तुम्ही अशा वेबसाइटला व्हिजीट केली असेल. नोटिफिकेशन सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ते सहज बंद करू शकता.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान