स्मार्ट फोन किंवा कॉम्प्युटरवरून आज जगातील काहीही शोधायचे म्हटले की हात आपोआप गुगल डॉट कॉम टाईप करण्याकडे वळतात. एवढे आपण गुगलच्या आहारी गेलो आहोत. मात्र, सर्च इंजिनच्या दुनियेत मक्तेदारी असलेल्या गुगलला अॅपलचे पाय धरावे लागले आहेत. तेसुद्धा अॅपलच्या सफारी या ब्राऊजरमध्ये डिफॉल्ट सर्चइंजिन म्हणून राहण्यासाठी. यासाठी गुगलने तब्बल 9 अब्ज डॉलर मोजले आहेत.
मोबाईल क्षेत्रामध्ये जवळपास गुगलच्या अँड्रॉईडची मक्तेदारी आहेत. तर केवळ 20 टक्केच लोक आयफोन वापरतात. तसेच अॅपलचे कॉम्प्युटरही महागडे असल्याने फार कमी आहेत. मात्र, यासाठी गुगलने एवढी मोठी रक्कम मोजल्याने आश्चर्य वाटत असेल. परंतू, तशी कारणेही आहेत. एकतर गुगल जाहीराती आणि इतर सेवांद्वारे कंपन्यांकडून मोठी रक्कम कमावत असते. अॅपलचा ग्राहक हा उच्चशिक्षित आणि श्रीमंत आहे. यामुळे असे ग्राहक गमावणे गुगलसाठी नुकसानीचे ठरू शकते. यामुळे गुगलने गेल्या वर्षीपेक्षा तिप्पट दराने अॅपलच्या ब्राऊजरवर आपलेच सर्च इंजिन राहण्यासाठी रक्कम खरेदी केली आहे. तर पुढील वर्षी 12 अब्ज डॉलर यासाठी मोजणार आहे.
यामध्ये आणखी एक गोष्ट आहे. गुगल आणि अॅपलमध्ये सहकार्य करार आहे. मात्र, तो केवळ सफारी ब्राऊजरपुरताच. अॅपलच्या नव्या सिरी ब्राऊजरमध्ये मायक्रोसॉफ्टचे बिंग हे सर्च इंजिन बाय डिफॉल्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, अॅपलचे ग्राहक गुगलच्या अॅपद्वारे गुगलचा वापर करतात आणि सिरीकडे फिरकतच नाहीत. महत्वाचे म्हणजे इतर कंपन्यांच्या अँड्रॉईड फोनमध्येही त्यांचे स्वत:चे ब्राऊजर आहेत. मात्र, लोक गुगल क्रोमचाच वापर करतात.
मात्र, गुगलच्या क्रोमनंतर सफारीचाच वापर जास्त केला जातो. यामुळे गुगलला सफारी वापरणारा ग्राहक कोणत्याही किंमतीत हवा आहे. अॅपलचे उत्पन्न हे त्यांच्या आयफोनच्या विक्रीवर आहे. कंपनीला त्यांच्या सफारीद्वारे उत्पन्न सुरु करण्याचे ठरविले आहे. यामुळे गुगलला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आहे.