फ्लॅट टीव्हीच्या जमान्यात साधारण एलईडी टीव्ही कधीच मागे पडले असून आता इंटरनेटही पाहू शकणाऱ्या स्मार्ट टीव्हीचा जमाना आला आहे. अगदी 24 इंचांपासून 72 इंचांपर्यंत स्मार्ट टीव्ही बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, आपल्यासाठी योग्य टीव्ही कोणता हे पहावे लागते.
बऱ्याचदा मोठ्या हॉलमध्ये छोट्या साईजचा टीव्ही लावला जातो. तर छोट्या हॉलमध्ये मोठा टीव्ही लावला जातो. जो पाहण्यासाठी सोयीचा वाटत नाही. 24 ते 32 इंचाचा टीव्ही कॉम्प्युटर साठी वापरला जातो. किंमत कमी असल्याने छोट्या ड्रॉईंग रुममध्ये योग्य. सध्या बाजारातील या साईजच्या टीव्हीवर 4के व्हिडिओ पाहता येतात. या टीव्हीची किंमत 15 ते 20 हजाराच्या आसपास आहे.
40 ते 43 इंचाचे टीव्ही हे मध्यम आकाराचे असतात. या साईजच्या टीव्हीवर मुव्हीसह खेळांचा आनंद चांगल्या प्रकारे लुटता येतो. हॉलमध्ये चांगली जागा असल्यास हा टीव्ही उत्तम पर्याय ठरेल.
इन्फिनिटी किंवा मोठ्या स्क्रीनसाईजचा टीव्हीवर फुटबॉल, क्रिकेटसारखे खेळ पाहणे आनंद देणारेच ठरते. या टीव्हीचे रिझोल्यूशन जास्त असते. हा टीव्ही ड्राइंग रूमच्या भिंतीला पूर्णपणे झाकतो. खोलीची साईज मोठी असल्यास हा टीव्ही उत्तम. किंमत 60 हजारांपासून 3 लाखांपर्यंत आहे.