स्मार्टफोन हल्ली आपल्या आयुष्याचा मोठा भाग बनला आहे. सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या या डिवाइसची सवय झालेली असते. काही वर्षांनी युजर्स आपला स्मार्टफोन बदलतात तर काही युजर्स दरवर्षी आपला स्मार्टफोन अपग्रेड करत असतात. यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स देखील बायबॅकचा पर्याय देऊन ग्राहकांना दरवर्षी नवीन डिवाइस घेण्यासाठी आकर्षित करतात. अनेकदा कोणतंही कारण नसताना स्मार्टफोन बदलणं तोट्याचं ठरू शकतं. कंपन्या देखली स्मार्टफोन अपग्रेड करण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करत आहेत.
नवीन फोन घेण्याची घाई
नवीन स्मार्टफोन आल्यावर ग्राहकांना तो विकत घेण्याचा मोह आवरत नाही. परंतु सामान्य ग्राहकांच्या एक बाब लक्षात येत नाही, ती म्हणजे नवीन स्मार्टफोन्सची किंमत जास्त असते. परंतु हाच फोन नंतर कमी किंमतीत विकला जातो. तसेच हेच स्मार्टफोन एखाद्या ऑनलाईन सेलमध्ये देखील मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध होतात.
फीचर्समध्ये जास्त बदल नसतो
दरवर्षी स्मार्टफोनमध्ये इतकाही मोठा बदल झालेला नसतो. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवा मॉडेल काही एक्सट्रा फीचर्ससह येतो. याचं मोठं उदाहरण म्हणजे Apple iPhone. कंपनी जास्त बदल न करता नवीन स्मार्टफोन सादर करत असते, असा आरोप कंपनीचे चाहते देखील करतात. त्यामुळे अनेकदा अपग्रेड हा घाट्याचा सौदा वाटतो.
विशेष म्हणजे Apple आपल्या जुन्या डिव्हाइसेसना देखील वेळच्या वेळी iOS अपडेट देतं. त्यामुळे नव्या हँडसेटमध्ये नवीन फीचर्स मिळत नाहीत. तरीही आकर्षक एक्सचेंज ऑफर देऊन कंपनी ग्राहकांना अपग्रेड करण्यास तयार करते.