शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

अरेरे! तुम्हीही सतत Thumbs Up इमोजी पाठवता का?; खरा अर्थ समजल्यावर बसेल मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 4:29 PM

Thumbs Up : अनेकदा आपण एखाद्या इमोजीचा अर्थ जो समजतो, प्रत्यक्षात त्याचा तो अर्थ नसतो.

नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. आजकाल इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या माध्यमातून आपण एकमेकांशी बोलताना हमखास इमोजीचा (Emoji) वापर करतो. शब्द मर्यादा किंवा वेळ कमी असणं, हे त्यामागचं कारण अनेकदा सांगितलं जातं. त्यामुळेच संवाद साधण्यासाठी इमोटिकॉन (Popular Emoticons) किंवा इमोजी खूप जास्त लोकप्रिय झाल्या आहेत. पण बहुतेकांना या इमोजीचा खरा अर्थ काय आहे, हे माहिती नसतं.

सर्वात लोकप्रिय इमोजींपैकी एक म्हणजे 'थम्स अप' (Thumbs Up) इमोजी, म्हणजे तोच इमोटिकॉन जो बऱ्याचदा एकमेकांना अ‍ॅप्रूव्हल देण्यासाठी, कधी कधी काम व्यवस्थित पूर्ण झाल्याचं सांगण्यासाठी पाठवला जातो. पण जेव्हा एका महिलेने या इमोजीचा खरा अर्थ (Real Emoji Meanings) टिकटॉक (TikTok) वर सांगितला तेव्हा अनेकांना आपण हा इमोजी कुणाला आणि कशासाठी पाठवला हे आठवून स्वतःची लाज वाटली.

'थम्स अप' इमोजीचा नेमका अर्थ काय?

@genwhyscarlett नावाच्या टिकटॉक अकाऊंटवरून एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून, स्कार्लेट नावाच्या महिलेने नुकतेच स्पष्ट केलं आहे की, इमोजी पाठवण्याच्या आपल्या सवयीबाबत थोडा विचार करण्याची गरज आहे. याचे कारण म्हणजे अनेकदा आपण एखाद्या इमोजीचा अर्थ जो समजतो, प्रत्यक्षात त्याचा तो अर्थ नसतो. उदाहरण म्हणून स्कारलेटने 'थम्स अप' ( Thumbs Up) हा इमोजी घेतला व ती म्हणाली, हा इमोजी बऱ्याचदा एखाद्याला प्रोत्साहन देण्यासाठी, अ‍ॅप्रूव्हल देण्यासाठी एकमेकांना पाठवला जातो. पण याचा खरा अर्थ अपमान असा आहे. त्यामुळे तुम्हाला 'थम्स अप' हा इमोजी मिळाला तर ही लाजिरवाणी, अपमान करणारी बाब आहे.

टिकटॉक स्टार स्कार्लेट पुढे म्हणाली, 'डोळ्यात अश्रू असलेले इमोजी म्हणजे निरागसता, तर जीभ बाहेर काढून डोळे मिचकावणारे इमोजी म्हणजे मूर्ख. उलट्या चेहऱ्याच्या इमोजीचा अर्थ म्हणजे आयुष्याला घाबरणं, तर दोन डोळे म्हणजे आपण ऐकत आहोत. माइंड ब्लोइंग इमोजी म्हणजे खुशामत करणं.' 30 वर्षांच्या स्कार्लेटचा व्हिडिओ आतापर्यंत 9 लाख लोकांनी पाहिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप