शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

2020पर्यंत मिळणार नाही दिलासा; आऊटगोइंग कॉलसाठी द्यावे लागणार 6 पैसे प्रति मिनिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 09:00 IST

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ने मोबाइल ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

नवी दिल्लीः भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ने मोबाइल ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एक ऑपरेटरच्या नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्क कॉल केल्यास 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारलं जाणार असल्याचं ट्रायनं स्पष्ट केलेलं आहे. एक वर्षापर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर 2020पर्यंत हे शुल्क वसूल केलं जाणार आहे. ट्रायनं आपल्या विधानात सांगितलं होतं की, वायरलेस टू वायरलेस घरगुती कॉल्सवर सहा पैसे प्रतिमिनिट टर्मिनेशन शुल्क 31 डिसेंबर, 2020पर्यंत आकारलं जाणार आहे.पहिल्यांदा हे शुल्क 14 पैसे प्रतिमिनिट आकारलं जात होतं, 2017ला ते घटवून सहा पैसे प्रतिमिनिट करण्यात आलं आहे. 1 जानेवारी 2020पर्यंत हे शुल्क संपुष्टात येणार असल्याचं बोललं जात आहे. ट्रायनं या शुल्क वसुलीची मुदत एका वर्षानं वाढवली आहे. वायरलेस टू वायरलेस घरगुती कॉल्सवर सहा पैसे प्रतिमिनिट शुल्क एक जानेवारी 2021पर्यंत संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ट्रायच्या या निर्णयाचं सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI)नं स्वागत केलं आहे.  सीओएआयचे महासंचालक राजन एस. मॅथ्यू म्हणाले, ट्रायचं हे पाऊल योग्य दिशेनं पडलं आहे. COAIनं दूरसंचार क्षेत्रातील गंभीर वित्तीय तणाव दूर करण्यासाठी आम्ही सरकार आणि नियामकांसोबत असल्याचं सांगितलं आहे. जिओला मोठा झटका ट्रायच्या या निर्णयानं जिओला मोठा झटका बसला आहे. कारण आययूसी शुल्क वसूल करताना जिओनं सांगितलं होतं की, हे शुल्क काही महिन्यांसाठी आकारलं जाणार आहे. त्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. परंतु आता जिओ 31 डिसेंबर 2020पर्यंत आययूसी शुल्क समाप्त करू शकणार नाही. अशातच जिओच्या वापरकर्त्याला पुढच्या एक वर्षापर्यंत आययूसी शुल्क द्यावं लागणार आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग करता येते. 

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय