मायक्रोसॉफ्ट Windows 11 हि आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम लवकरच घेऊन येणार आहे. Windows 10 युजर्सना या नवीन सिस्टमवर मोफत अपग्रेड करता येईल, अश्या बातम्या आल्या होत्या. परंतु आता अशी बातमी येत आहे कि,Windows 7 आणि Windows 8.1 युजर्सना देखील हा फ्री अपग्रेड देण्यात येईल. नव्या ऑपरेटिंग सिस्टमच्या अधिकृत घोषणेपुर्वीच अपग्रेड सपोर्टशी निगडित एक लीक समोर आला आहे, त्यातून हि माहिती समोर आली आहे. (Microsoft may gave Windows 11 free upgrade to windows 7 and windows 8.1 users)
XDA Developers ने लीक झालेली Windows 11 ची बिल्ड मिळाली आहे. या बिल्डमध्ये कॉन्फिगरेशन कीज दिसत आहेत. या कीजमध्ये Windows 7 आणि Windows 8.1 चे टाइटल आहेत. यावरून असा अंदाज लावला जात आहे कि, माइक्रोसॉफ्ट जुन्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच्या युजर्सना मोफत अपग्रेड देऊन विंडोज 11 वर घेऊन येणार आहे.
असेच काहीसे मायक्रोसॉफ्टने Windows 10 च्या वेळी देखील केले होते. तेव्हा सुरु करण्यात आलेल्या अपग्रेड प्रोग्रॅमअंतर्गत कंपनीने Windows 7 आणि Windows 8 युजर्सना मोफत Windows 10 चा अपग्रेड दिला होता. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने Windows 7 साठी सपोर्ट देणे बंद केले होते.
24 जूनला लाँच होणाऱ्या Windows 11 ऑपरेटिंग सिस्टममध्ये नवीन स्टार्ट मेन्यू देण्यात येईल आणि असेच अनेक बदल दिसतील जे Windows 10 पेक्षा वेगेळे असतील. लाँच झाल्यानंतर त्वरित हि सिस्टम जुन्या युजर्ससाठी उपलब्ध होईल कि नाही याबाबत मात्र अजूनतरी माहिती मिळाली नाही.