गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर नवे फिचर पिंगा घालू लागले आहे. मात्र, ते सर्वांसाठी नाही. अद्याप या फिचरचे टेस्टिंग सुरू आहे. मात्र, तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन स्टिकरवाले व्हॉट्स अॅप कसे मिळवावे ते पाहता येणार आहे. मात्र, या शिवाय तुमचा स्वत:चा स्टिकरही बनविता येणार आहे. हा स्टिकर कसा बनवायचा ते पाहुया...
व्हॉट्सअॅप स्टिकर्स सापडतच नाहीत का? 'या' टिप्स वापरा आणि आनंद वाटा!
तसे स्टिकर बनविण्याची प्रक्रिया थोडी किचकट आहे. स्वत:चे स्टिकर बनविण्यासाठी व्हॉट्सअॅपने काही अटी ठेवलेल्या आहेत. सर्व प्रथम या स्टिकरचे बॅकग्राऊंड पारदर्शक असायलाच हवे. तसेच या इमेजची साईज 512×512 पिक्सल्स हवी. ही इमेज 100 केबीच्या आत असायला हवी. तसेच ती इमेज घेताना स्टिकरवर 16 मेगापिक्सलची मार्जिन म्हणजेच मोकळी जागा असायला हवी.
एवढे सगळे केल्यानंतर स्टिकर पॅकमध्ये येण्यासाठी आयकॉनची साईज 96×96 पिक्सल आणि 50 केबीच्या आत असायला हवी. यानंतर तुम्ही तुमचा फोटो असलेला स्टिकर बनवू शकता. हा स्टिकर पॅकमध्ये कन्हर्ट करण्यासाठी पर्सनल स्टिकर फॉर व्हॉट्सअॅप म्हणून अॅप गुगल प्लेस्टोअरवर मिळेल. ते डाईनलोड करून सुरु केल्यानंतर तुम्ही बनविलेला स्टिकर त्यात दिसेल. त्याच्या शेजारील बटनावर क्लीक करून अॅड केल्यानंतर तो व्हॉट्सअॅपमध्ये दिसायला लागेल.
टिप : काही फोटो आधी फोटो एडिटर अॅपवर एडिट केलेले असल्यास तेही या पॅकसाठी दिसण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपने स्टिकर बनविण्यासाठी अधिकृत GitHub नावाची मार्गदर्शक सूची दिली आहे.