World Biggest Data Leak: डेटा लीकच्या अनेक घटनांबद्दल तुम्ही ऐकले असेल, परंतु एका रिपोर्टमध्ये जगातील सर्वात मोठ्या डेटा लीकचा खुलासा झाला आहे. या डेटा लीकमध्ये 26 अब्ज अकाउंट्सची माहिती आहे. यामध्ये अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचे लॉगिन क्रेडेंशियल्स आहेत. एवढ्या मोठ्या प्रमणावर डेटा लीक झाल्यामुळे चिंता वाढली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 अब्ज खात्यांचा माहिती लीक झाली आहे. यामध्ये LinkedIn, Snapchat, Venmo, Adobe आणि X (पूर्वीचे Twitter) चा डेटा आहे. त्यामुळेच याला इतिहासातील सर्वात मोठा डेटा लीक म्हटले जात आहे. या डेटामध्ये लॉगिन क्रेडेंशियल्ससह इतर तपशील आहे. या डेटाच्या मदतीने सायबर गुन्हेगार विविध प्रकारच्या घटना घडवून आणू शकतात.
12TB डेटा लीक झालामिळालेल्या माहितीनुसार, 12TB डेटा लीक झाला आहे. लीक झालेला बहुतांश डेटा चिनी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेनसेंटचा आहे. त्यांच्या 1.4 अब्ज युजर्सचा डेटा लीक झाला आहे. दुसऱ्या स्थानावर Weibo आहे, ज्यांच्या 504 मिलियन खात्यांचा डेटा लीक झाला आहे. यानंतर MySpace चे 36 कोटी अकाउंट्स, ट्विटरचे 28.1 कोटी यूजर्स, म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Deezer चे 25.8 कोटी यूजर्स आणि LinkedIn च्या 25.1 कोटी यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. याशिवाय Adobe, Telegram, Dropbox, Doordash, Canva आणि Snapchat यासह इतर अनेक प्लॅटफॉर्मवरील डेटा त्यात समाविष्ट आहे.