शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

नोकियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; प्रतिस्पर्धी कंपन्यांना धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 11:51 AM

नोकियानं स्मार्टफोनवर जगातील सर्वात जास्त 5G स्पीड ओवर-द-एयर नेटवर्कवर मिळवल्याचा दावा केला आहे. कंपनीला टेक्सासच्या डल्लासमध्ये सर्वात जास्त 5G कनेक्शन स्पीड मिळाला आहे.

ठळक मुद्देनोकियाचे 1100 असो किंवा 6600 हे मोबाइल ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते.फिनलँडची टेक कंपनी असलेल्या नोकियानं स्मार्टफोनवर जगातील सर्वात जास्त 5G स्पीड ओवर-द-एयर नेटवर्कवर मिळवल्याचा दावा केला आहे. कंपनीकडून कमर्शियल 5G सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या मदतीने 5G स्पीडची चाचणी घेण्यात आली.

नवी दिल्लीः कधी काळी नोकिया कंपनीच्या मोबाइलची प्रचंड क्रेझ होती. नोकियाचे 1100 असो किंवा 6600 हे मोबाइल ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते. कालांतरानं नोकिया इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत काहीशी मागे पडल्याचं चित्र निर्माण झालं होतं. पण आता नोकियानं नवाच रेकॉर्ड स्वतःच्या नावे करून घेतला आहे. फिनलँडची टेक कंपनी असलेल्या नोकियानं स्मार्टफोनवर जगातील सर्वात जास्त 5G स्पीड ओवर-द-एयर नेटवर्कवर मिळवल्याचा दावा केला आहे. कंपनीला टेक्सासच्या डल्लासमध्ये सर्वात जास्त 5G कनेक्शन स्पीड मिळाला आहे.कंपनीकडून कमर्शियल 5G सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या मदतीने 5G स्पीडची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी आता हा स्पीड 4.7 जीबीपीएसपर्यंत पोहोचला आहे. कंपनीकडून 800MHz कमर्शियल मिलीमीटर वेव 5G स्पेक्ट्रम आणि ड्यूल कनेक्टिविटी (EN-DC)फंक्शनॅलिटीच्या मदतीने या स्पीडची चाचणी घेण्यात आली. EN-DC च्या मदतीने डिव्हाईस लागोपाठ 5G आणि LTE नेटवर्क्सने कनेक्ट होत असल्यानं त्याच्या मदतीने दोन्ही एयर इंटरफेस टेक्नोलॉजीवर डेटा ट्रान्समिट आणि रिसिव्ह केला जाऊ शकतो. याचाच अर्थ डिव्हाईस 5G किंवा LTE ने कनेक्ट होऊन आणखी चांगली सेवा युजर्संना देता येत आहे. 5Gच्या मदतीने टॉप स्पीड आतापर्यंत डिव्हाईसेसमधून मिळालेला नाही. लवकरच बाकी देशात 5जी स्पेक्ट्रम आणि या संदर्भातील हार्डवेअरमध्ये सुधारणा करून युजर्संना चांगली सुविधा मिळू शकते. रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, 5जी नेटवर्क आधीच्या 4जी नेटवर्कच्या तुलनेत 10 पट अधिक जलद असू शकते. या प्रमाणे 5जी कनेक्शनच्या मदतीने युजर्संना 10Gbps पर्यंत टॉप स्पीड दिला जाऊ शकतो.गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हुवेईने 5G स्पीडचा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्याचा दावा केला होता. हुवेईला स्पीड टेस्टवेळी 2.96 जीबीपीएसचा स्पीड मिळाला होता. अनेक टेलिकॉम कंपन्यांकडून 5जी स्पीड टेस्ट करण्यात आली. परंतु नोकियाची टॉप स्पीड बाकीच्या कंपन्यांपेक्षा किती तरी पट अधिक आहे. नोकियाचा एअरस्केल रेडिओ अॅक्सेस इंडस्ट्री लिडिंग आणि कमर्शल अँड-टू-अँड 5जी सोल्युशन आहे. ज्यात ऑपरेटर्स ग्लोबली 5जी स्पेक्ट्रम असेट्सचा वापर करता येणार आहे, असे नोकियाने म्हटले आहे.

हेही वाचा

देशाच्या सार्वभौमत्व अन् प्रादेशिक अखंडतेत कोणतीही तडजोड नाही, भारतानं नेपाळला सुनावलं

पाकला चुना! चिनी कंपन्यांनी 60 अब्जांची गुंतवणूक करून कमावला 400 अब्ज रुपयांचा नफा

...म्हणून चीन अफवा पसरवतो, डोनाल्ड ट्रम्प यांनी साधला निशाणा 

एका कुटुंबाला कचऱ्यात सापडल्या दोन बॅगा अन् उघडून पाहतात तर काय...

CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका

टॅग्स :Nokiaनोकिया