मोटरोला कंपनीने भन्नाट कॅमेरा असलेले दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनची गेल्या काही काळापासून चर्चा होत होती. एवढ्या मेगापिक्सलचा जगभरातील बाजारात उपलब्ध झालेला हा पहिलाच फोन आहे.
Motorola Edge 30 Ultra मध्ये हा २०० मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यामध्ये 50MP Ultrawide आणि Macro Lens +12MP telephoto lens देखील आहे. या स्मार्टफोनमध्ये 60MP High-Resolution सेल्फी कॅमेरादेखील देण्यात आला आहे. Qualcomm chipset – Snapdragon 8+ gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. याबरोबर सुपरफास्ट चार्जिंगसाठी 125W चा चार्जर देण्यात आला आहे.
अल्ट्रा प्रिमिअम डिझाईनमध्ये हा फोन येतो. यामध्ये 144Hz Curved pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. वजनाला देखील हा फोन इतरांच्या तुलनेत हलका म्हणजेच 175g आहे. या स्मार्टफोनची किंमती 59,999 रुपये ठेवण्यात आलेली आहे. मात्र लाँच प्राईस 54,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री २२ सप्टेंबर २०२२ पासून सुरु होणार आहे.
दुसरा स्मार्टफोन Motorola edge 30 fusion ची किंमत 42,999 रुपये असणार आहे. मात्र, लाँच प्राईस 39,999 असेल. याचीही विक्री २२ सप्टेंबर २०२२ पासून सुरु होणार आहे. पिक्चर क्वालिटीवर कंपनीने खूप काम केले आहे. यामध्ये 6.55 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. 144Hz रिफ्रेश रेट मिळणार आहे. 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. 13 मेगापिक्सल अल्ट्रावाईड, २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.