शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

25 वर्ष जुन्या गेमसाठी तब्बल 11 कोटींची बोली; Super Mario बनला जगातील सर्वात महागडा गेम 

By सिद्धेश जाधव | Published: July 13, 2021 1:01 PM

Super Mario 64 auction: Heritage Auctions वर Super Mario 64 चा लिलाव झाला होता, ज्यात गेमची 25 वर्ष जुनी sealed copy 15,00,000 यूएस डॉलरला विकली गेली.

सध्या आपल्या आयुष्यात स्मार्टफोन्सनी अनेक गोष्टींची जागा घेतली आहे. अगदी घड्याळ आणि अलार्म पासून ते टीव्ही आणि गेमिंग कन्सोल पर्यंत. अशा अनेक गोष्टींची जागा कमी जास्त प्रमाणात आपल्या हातातील या तबकडीने घेतली आहे. परंतु जुन्या आठवणींची जागा स्मटफोन घेऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याचे एक उदाहरण अमेरिकेतून समोर आले आहे. 90 च्या दशकातील व्हिडीओ गेम कॅसेट्ससाठी एका माणसाने कोटींची बोली लावली आहे. या माणसाने 90’s मधील सुपरहिट Super Mario 64 Game ची sealed copy (सीलबंद प्रत) विकत घेतली आहे. आणि आपली ही आवड पूर्ण करण्यासाठी या व्यक्तीने $1.5 Million म्हणजे 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली आहे.  (Super Mario 64 sells for more than $1.5m at auction)

गेमवर लाखो खर्च करणाऱ्या लोकांची उदाहरणे सध्या काही उदाहरणे मिळू शकतात, परंतु एवढी रक्कम खर्च करणारा हा पहिलाच व्यक्ती आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार अमेरिकन मल्टी-नॅशनल ऑक्शन हाउस, Heritage Auctions वर हा ऐतिहासिक सौदा झाला आहे. रविवारी या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ गेम Super Mario 64 चा लिलाव झाला होता, ज्यात गेमची 25 वर्ष जुनी sealed copy विकली जात होती. या लिलावात गेमची किंमत 15,00,000 यूएस डॉलर निश्चित झाली. म्हणजे 25 वर्ष जुना गेम 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकत घेण्यात आला.  

11 कोटी रुपयांमध्ये विकलेल्या गेलेल्या ‘मारियो’ गेमला Wata 9.8 A++ रेटिंग मिळाली आहे. या लिलावानंतर Super Mario 64 जगातील सर्वात महाग गेम बनला आहे. यापूर्वी हा विक्रम The Legend of Zelda गेमच्या नावावर होता, हा गेम  $870,000 मध्ये विकला गेला आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात महागड्या टॉप 5 गेम्सच्या यादीत Super Mario Bros. च्या चार वेगवेगळ्या व्हर्जन्सचा समावेश आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन