Xiaomi लवकरच भारतात आपला नवीन 4G Phone सादर करणार आहे. हा फोन Redmi Note 11 4G नावानं सादर केला जाईल. तत्पूर्वी कंपनीनं चीनमध्ये Xiaomi 11 Youth Vitality Edition नावाचा नवीन फोन लाँच केला आहे. ज्यात Snapdragon 778G chipset, 8GB RAM, 64MP Rear, 20MP Selfie Camera आणि 33W fast charging असे फीचर्स मिळतात.
Xiaomi 11 Youth Vitality Edition चे स्पेसिफिकेशन्स
हा शाओमी फोन 6.55 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा मोबाईल अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड मीयुआय 12.5 वर चालतो. कंपनीनं यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट दिला आहे. सोबत 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते.
शाओमी 11 यूथ व्हायटॅलिटी एडिशनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. हा फोन 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच यातील 4,250एमएएचची बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Xiaomi 11 Youth (Vitality Edition) ची किंमत
या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1999 युआन (सुमारे 23,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर फोनचा 8 जीबी रॅम आणि 256 जीबी मेमरी मॉडेल 2299 युआन (सुमारे 27,300 रुपये) विकत घेता येईल.