Xiaomi 11i HyperCharge 5G Phone Launch: Xiaomi नं आपली बहुप्रतीक्षित Xiaomi 11i Series भारतात सादर केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीनं Xiaomi 11i आणि Xiaomi 11i HyperCharge हे दोन 5G Phone लाँच केले आहेत. या शाओमी फोन्सनी Mediatek Dimensity 920 चिपसेट, 8GB RAM, 108MP Camera आणि 120W fast charging अशा दमदार स्पेसीफाकेशन्ससह एंट्री घेतली आहे.
Xiaomi 11i सीरिजचे स्पेसिफिकेशन्स
शाओमी 11आय सीरीजमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1200निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. ही सीरिज अँड्रॉइड 11 बेस्ड मीयुआय 3.0 वर चालते. तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि माली जी68 जीपीयू प्रोसेसिंगची जबाबदारी सांभाळतात. सोबत LPDDR4x RAM आणि UFS2.2 स्टोरेज देण्यात आली आहे.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. दोन्ही फोन्स 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.
या सीरिजची सर्वात मोठी खासियत बॅटरी सेगमेंट आहे. तसेच Xiaomi 11i आणि Xiaomi 11i HyperCharge यांच्यातील फरक देखील इथे दिसून येतो. यातील हायपरचार्ज व्हर्जनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. हा फोन फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होतो असा दावा कंपनीनं केला आहे. तर शाओमी 11आय स्मार्टफोनमध्ये 5,160एमएएच बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
Xiaomi 11i सीरिजची किंमत
- Xiaomi 11i HyperCharge 5G 6GB/128GB: 26,999 रुपये
- Xiaomi 11i HyperCharge 5G 8GB/128GB: 28,999 रुपये
- Xiaomi 11i 5G 6GB/128GB: 24,999 रुपये
- Xiaomi 11i 5G 8GB/128GB: 26,999 रुपये
हे दोन्ही शाओमी फोन 12 जानेवारीपासून खरेदी करता येतील.
हे देखील वाचा:
Samsung कडून न्यू ईयरचं गिफ्ट; TV विकत घेतल्यास साउंडबार आणि टॅबलेट मोफत
10 मिनिटांच्या चार्जवर 20 तास चालणार Oppo चा Bluetooth Neckband; मिळतेय 300 रुपयांची सूट