Xiaomi 11i HyperCharge 5G आणि Xiaomi 11i 5G स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतीयांच्या भेटीला आले आहेत. यातील हायपर चार्ज व्हर्जन फक्त 15 मिनिटांत फुलचार्ज होतो, असा दावा कंपनीनं केला आहे. यात 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. आज म्हणजे 12 जानेवारी 2022 पासून हे दोन्ही स्मार्टफोन्स खरेदी करता येतील.
Xiaomi 11i HyperCharge 5G किंमत आणि उपलब्धता
- Xiaomi 11i HyperCharge 5G 6GB/128GB: 26,999 रुपये
- Xiaomi 11i HyperCharge 5G 8GB/128GB: 28,999 रुपये
- Xiaomi 11i 5G 6GB/128GB: 24,999 रुपये
- Xiaomi 11i 5G 8GB/128GB: 26,999 रुपये
हायपरचार्ज व्हर्जन एसबीआय कार्डनं विकत घेतल्यास 2,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. सोबत न्यू ईयर ऑफर अंतगर्त 1,500 रुपयांची सूट आणि 500 रुपयांचे Redmi कुपन मोफत मिळत आहेत. तसेच जुना Redmi फोन एक्सचेंज करून तुम्ही अजून 4000 रुपये वाचवू शकता. Xiaomi 11i HyperCharge 5G आणि Xiaomi 11i 5G आज दुपारी 12 वाजल्यापासून mi.com, Mi Home, Flipkart आणि रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येतील.
Xiaomi 11i सीरिजचे स्पेसिफिकेशन्स
शाओमी 11आय सीरीजमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1200निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. ही सीरिज अँड्रॉइड 11 बेस्ड मीयुआय 3.0 वर चालते. तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि माली जी68 जीपीयू प्रोसेसिंगची जबाबदारी सांभाळतात. सोबत LPDDR4x RAM आणि UFS2.2 स्टोरेज देण्यात आली आहे.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. दोन्ही फोन्स 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.
या सीरिजची सर्वात मोठी खासियत बॅटरी सेगमेंट आहे. तसेच Xiaomi 11i आणि Xiaomi 11i HyperCharge यांच्यातील फरक देखील इथे दिसून येतो. यातील हायपरचार्ज व्हर्जनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. हा फोन फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होतो असा दावा कंपनीनं केला आहे. तर शाओमी 11आय स्मार्टफोनमध्ये 5,160एमएएच बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: