Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन यावर्षी जानेवारीमध्ये भारतीयांच्या भेटीला आला होता. कंपनीनं यात 120W फास्ट चार्जिंग दिली आहे, जी फक्त 15 मिनिटांत स्मार्टफोनला फुल चार्ज करते. इतकंच नव्हे तर या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम, 108MP चा कॅमेरा, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे. आता हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.
किंमत आणि ऑफर
Xiaomi 11i HyperCharge च्या 6GB/128GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB/128GB मॉडेलसाठी 28,999 रुपये मोजावे लागतील. या फोनच्या खरेदीवर आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड धारकांना 2000 रुपयांची सूट मिळेल. तसेच Mi.com कडून या फोनवर 1000 रुपयांचा बोनस मिळत आहे. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत 3,000 रुपयांची बचत करता येईल. अशाप्रकारे हा फोन 6 हजार रुपये सवलतीसह विकत घेता येईल.
Xiaomi 11i HyperCharge चे स्पेसिफिकेशन्स
मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1200निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड मीयुआय 12.5 वर चालतो. तसेच यात मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि माली जी68 जीपीयू प्रोसेसिंगची जबाबदारी सांभाळतात. सोबत LPDDR4x RAM आणि UFS2.2 स्टोरेज देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे.
या फोनची सर्वात मोठी खासियत बॅटरी सेगमेंट आहे. Xiaomi 11i HyperCharge मध्ये 4,500एमएएचची बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. हा फोन फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होतो असा दावा कंपनीनं केला आहे.