Xiaomi Phones: Xiaomi भारतात अनेक स्मार्टफोन सादर करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. हे फोन्स कंपनीनं चीनसह जागतिक बाजारात सादर केले आहेत. यातील काही फोन्स लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होतील अशी माहिती 91mobiles नं टिपस्टर ईशान अग्रवालच्या हवाल्याने दिली आहे. यात Xiaomi 11T, Xiaomi 11T Pro आणि Redmi 10 2022 स्मार्टफोनचा समावेश आहे.
रिपोर्टनुसार,शाओमी लवकरच भारतात बजेटमध्ये Redmi 10 2022 सादर करू शकते, जो अनेक सर्टिफिकेशन साईट्सवर दिसला आहे. तसेच Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro हे फ्लॅगशिप फोन देखील देशात लाँच केले जाऊ शकतात, जे जागतिक बाजारात आले आहेत. या स्मार्टफोन्ससह Redmi Smart Band Pro, Redmi Watch 2, Watch 2 Lite, आणि Xiaomi Watch S1 Active हे स्मार्टवॉच देखील कंपनी भारतात सादर करू शकते, अशी माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 11T Pro फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे.
या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. बेस मॉडेलप्रमाणे या फोन मध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Xiaomi 11T चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 11T मधील डिस्प्लेवर कंपनीनं खूप काम केल्याचं दिसतं. यातील 6.67-इंचाचा FHD+ TrueColour डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, आयकेयर मोड, 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास Victus लेयर प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. या 5G फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 Ultra चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 256GB ची इंटरनल स्टोरेज मिळते. फोन Android 11 OS सह MIUI 12.5 कस्टम स्किनवर चालतो.
Xiaomi 11T मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपची खासियत यातील 108MP चा मुख्य सेन्सर आहे. ज्याला 120-डिग्री FoV असलेल्या 8MP च्या अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आणि 3x झूम देणाऱ्या टेली-मॅक्रो कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच पॉवर बॅकअपसाठी Xiaomi 11T मध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.