Xiaomi 11T Pro 5G गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर अखेरीस भारतात लाँच झाला आहे. शाओमीनं या स्मार्टफोनची किंमत कमी ठेवली आहे. त्यामुळे या महिन्यात आलेल्या Samsung Galaxy S21 FE आणि OnePlus 9RT ला हा एक दमदार पर्याय ठरू शकतो. हा फोन Snapdragon 888, 5000mAh बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट, हरमन कार्डन स्पिकर आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट अशा फीचर्ससह बाजारात आला आहे.
Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 11T Pro मध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे.
या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. फोनमध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी यात 5जी, 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो. सोबत या फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉससह ड्युअल हार्मन कार्डन स्पिकर देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
Xiaomi 11T Pro 5G ची किंमत
भारतात Xiaomi 11T Pro च्या 8GB रॅम आणि 128GB मॉडेलची किंमत 39,999 रुपयेठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी 41,999 रुपये मोजावे लागतील. फोनचा मोठा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 43,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन Amazon, Mi वेबसाईट आणि Mi Home Studios च्या माध्यमातून विकत घेता येईल. या फोनवर लाँच ऑफर अंतगर्त 5 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तसेच जुना फोन एक्सचेंज करून आणखीन 5,000 रुपयांची बचत करता येईल.
हे देखील वाचा:
आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट! iPhone 12 Mini वर फ्लिपकार्ट देतंय तगडी सूट; अशी आहे ऑफर