शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

Xiaomi 11T Pro India Launch: 12GB RAM आणि 108MP कॅमेऱ्यासह Xiaomi चा ढासू फोन लाँचसाठी सज्ज; वाढू शकतात वनप्लसच्या अडचणी 

By सिद्धेश जाधव | Published: December 04, 2021 12:46 PM

Xiaomi 11T Pro India Launch: Xiaomi 11T Pro लवकरच भारतात तीन रॅम आणि तीन कलर व्हेरिएंटसह सादर केला जाईल. हा फोन 12GB RAM, 108MP Camera, 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग, अशा भन्नाट स्पेसिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे.

Xiaomi 11T Pro स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी युरोपियन बाजारात आला होता. तेव्हपासून या फोनच्या भारतीय लाँचची वाट बघितली जात आहे. हा फोन 12GB RAM, 108MP Camera, 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग, अशा भन्नाट स्पेसिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. आता फोन ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. त्यामुळं फोनचा भारतीय लाँच नजीक असल्याचा अंदाज लावला जात आहे.  

या लिस्टिंगमधून Xiaomi 11T Pro च्या तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. 2107113 मॉडेल नंबर असलेला हा फोन 8GB/128GB, 8GB/256GB आणि 12GB/256GB या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. तसेच या फोनचे तीन कलर व्हेरिएंट देखील देशात लाँच केले जातील, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्मानं ट्वीट करून दिली आहे.  

Xiaomi 11T Pro Price In India  

युरोपात Xiaomi 11T Pro चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 649 युरो (जवळपास 56,400 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तर 8GB/256GB व्हेरिएंट 699 युरो (जवळपास 60,800 रुपये) आणि 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 749 युरो (जवळपास 65,100 रुपये) ठेवण्यात आली आहे. भारतीय किंमत देखील याच रेंजमध्ये असू शकते.  

Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स  

नावावरून समजले असेल कि Xiaomi 11T Pro या सीरिजमधील पॉवरफुल फोन आहे. स्पेसिफिकेशन्समधून देखील ही पॉवर दिसून येते. कारण या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे.   

या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. बेस मॉडेलप्रमाणे या फोन मध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.   

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान