शाओमीने सप्टेंबरमध्ये Xiaomi 11T 5G आणि Xiaomi 11T Pro 5G हे दोन फोन जागतिक बाजारात सादर केले होते. Xiaomi 11T Pro स्मार्टफोनचा भारतीय व्हेरिएंट गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन नोव्हेंबरमध्ये देशात लाँच होईल. हा फोन जागतिक बाजारातील स्पेक्ससह लाँच केला जाईल. गुगल प्ले कन्सोलनुसार या फोनमध्ये FHD+ डिस्प्ले, Snapdragon 888 चिपसेट, 8GB RAM, आणि Android 11 OS मिळेल.
काही दिवसांपूर्वी Xiaomi 11T pro स्मार्टफोन 2107113SI या मॉडेल नंबरसह गेल्या महिन्यात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर लिस्ट करण्यात आला होता. तसेच हा फोन IMEI डेटाबेसवर देखील दिसला आहे. आता Xiaomi 11T Pro स्मार्टफोनचा इंडियन व्हेरिएंट Google Play Console वरील Supported Devices मध्ये दिसला आहे. या लिस्टिंगमुळे हा शाओमी फोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल हे निश्चित झाले आहे.
Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 11T Pro या सीरिजमधील पॉवरफुल फोन आहे. स्पेसिफिकेशन्समधून देखील ही पॉवर दिसून येते. कारण या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे.
या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. बेस मॉडेलप्रमाणे या फोन मध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.