गेले कित्येक दिवस Xiaomi 12S सीरिजची चर्चा सुरु आहे. आता कंपनीनं स्वतःहून हा सीरिजच्या लाँचची अधिकृत माहिती दिली आहे. Xiaomi 12S, Xiaomi 12S Pro स्मार्टफोनची माहिती कंपनीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून दिली आहे. त्यानुसार येत्या 4 जुलैला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून हे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स चीनमध्ये लाँच केले जातील.
Xiaomi 12S Series मध्ये कोणते फीचर्स
Xiaomi 12S सीरीजच्या फोन्समध्ये Leica ऑप्टिमाइज्ड फोटोग्राफी कॅमेरा एक्सपीरियंस मिळेल. वनप्लसनं देखील आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये चांगल्या फोटोग्राफीसाठी Leica लेन्सचा वापर केला आहे. या सीरिजमध्ये तीन हँडसेट सादर केले जातील. Xiaomi 12S आणि Xiaomi 12S Pro स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा लेटेस्ट Snapdragon 8+ Gen1 चिपसेट मिळेल. तर अजून एक Xiaomi 12S Pro Dimensity Edition देखील सादर केला जाईल, जो MediaTek च्या फ्लॅगशिप 9000 SoC सह येईल.
Xiaomi 12S आणि Xiaomi 12S Pro स्मार्टफोन्सचे 8GB/128GB, 8GB/256GB आणि 12GB/512GB असे तीन व्हेरिएंट सादर केले जाऊ शकतात. 3C सर्टिफिकेशन साईटनुसार, या सीरीजच्या बेस मॉडेलमध्ये 67W फास्ट चार्जिंग फीचर मिळेल. तर Pro मॉडेलमध्ये 120W फास्ट चार्जिंग असेल. Xiaomi 12 Pro Dimensity Edition चे 8GB/256GB आणि 12GB/512GB असे दोन व्हेरिएंट सादर केले जातील. लिस्टिंगनुसार, यात 67W फास्ट चार्जिंग फीचर मिळेल.
Xiaomi 12 सीरिजचा होणार विस्तार
Xiaomi 12S Series व्यतिरिक्त Xiaomi 12 Ultra, Xiaomi 12T आणि Xiaomi 12 Lite हे स्मार्टफोन्स देखील लवकरच येणार असल्याची माहिती आली आहे. यातील Xiaomi 12 Lite स्मार्टफोन Xiaomi 12 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल.