Xiaomi या वर्षाच्या शेवटी चार फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणार आहे, अशी बातमी गेल्या आठवड्यात आली होती. आता Xiaomiui.net नं Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom या दोन स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे. या रिपोर्टमधून तुम्हाला शाओमीच्या या दोन्ही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हे फोन्स 64MP Camera आणि Snapdragon प्रोसेसरसह सादर केले जाऊ शकतात.
Xiaomi 12 Lite चे लीक स्पेसिफिकेशन्स
रिपोर्टनुसार, Xiaomi 12 Lite स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा फुलएचडी AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. हा कर्व डिस्प्ले डिजाईनसह सादर करू शकतो. Xiaomi 12 Lite स्मार्टफोन Snapdragon 778G किंवा Snapdragon 780G चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात 64-मेगापिक्सलचा Samsung GW3 सेन्सर आणि सोबत अल्ट्रावाईड आणि मॅक्रो लेन्स देखील मिळेल.
Xiaomi 12 Lite Zoom चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 12 Lite Zoom स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz होगा. हा कर्व डिस्प्ले इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. यात प्रोसेसींगसाठी Snapdragon 778G किंवा Snapdragon 780G चिपसेट मिळेल. या फोनमध्ये 64MP चा Samsung GW3 सेन्सर मिळेल, त्याचबरोबर वाईड अँगल लेन्स आणि टेलीफोटो कॅमेरा असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. Xiaomi 12 Lite सीरीज Xiaomi Civi सारख्या डिजाईनसह सादर केली जाऊ शकते. Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom दोन्ही स्मार्टफोन पुढील वर्षी जागतिक बाजारात सादर केले जाऊ शकतात.