Xiaomi 12 Pro स्मार्टफोन भारतात येत्या 12 एप्रिलला लाँच होणार असल्याची माहिती याआधी आली आहे. या फोनसाठी अॅमेझॉनवर मायक्रोसाईट देखील लाईव्ह करण्यात आली आहे. जागतिक बाजारातील लाँचमुळे या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती तर आहे परंतु किंमत मात्र समजली नाही. आता टिपस्टर योगेश ब्रारनं Xiaomi 12 Pro च्या भारतीय किंमतीची माहिती दिली आहे.
Xiaomi 12 Pro ची संभाव्य किंमत
लीक माहितीनुसार, तो Xiaomi 12 Pro फोनची किंमत 65,000 रुपयांपासून सुरु होतील. तसेच कंपनी Xiaomi 12 आणि Xiaomi 12X स्मार्टफोन्स देखील भारतात सादर करू शकते. हे तिन्ही स्मार्टफोन्स याआधी जागतिक बाजारात लाँच झाले आहेत. भारतात Xiaomi 12X स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आणि Xiaomi 12X Pro स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 प्रोसेसरसह लाँच केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. हे तिन्ही फोन्स फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालू शकतात.
Xiaomi 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स
शाओमी 12 प्रो स्मार्टफोनमधील डिस्प्ले देखील शानदार आहे. यात 3200 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा 2के डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा ई5 अॅमोलेड एलटीपीओ पॅनल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला विक्टसच्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. हा फोन 10बिट कलर आणि 1500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
Xiaomi 12 Pro लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित नव्या कोऱ्या मीयुआय 13 वर चालतो. 3 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टकोर प्रोसेसरसह 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट या शाओमी 12 प्रो चा सर्वात मोठा आकर्षण बिंदू आहे. हा फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.
पावर बॅकअपसाठी Xiaomi 12 Pro मध्ये 4,600एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. यातील 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला हा फोन मिनिटांत फुल चार्ज करेल. हा फोन फक्त 15 मिनिटांत 0 ते 100 टक्के पर्यंत चार्ज होईल, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच हा डिवाइस 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी शाओमी 12 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स707 7पी लेन्स मुख्य सेन्सरचे काम करते. सोबत 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 50 मेगापिक्सलचाची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.