शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

Xiaomi 12 स्मार्टफोन झाला भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Mi 11 Ultra ची घेणार का जागा?  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 3:15 PM

Xiaomi 12 India Launch: आगामी Xiaomi 12 स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला आहे. हा फोन Mi 11 Ultra ची जागा घेऊ शकतो.

आजच बातमी आली आहे कि शाओमीने आपल्या सर्वात पॉवरफुल आणि अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन Mi 11 Ultra ची भारतातील विक्री बंद केली आहे. आगामी फ्लॅगशिपवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आता आगामी Xiaomi 12 स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाल्याची बातमी आली आहे.  

Xiaomi 12 कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. जो Qualcomm च्या आगामी फ्लॅगशिप चिपसेटसह लाँच होणारा जगातील पहिला स्मार्टफोन असेल. कंपनी हा फोन Snapdragon 898 चिपसेटसह सादर करू शकते. आता Xiaomi 12 स्मार्टफोनला ब्यूरो ऑफ इंडिया स्टँडर्ड (BIS) कडून सर्टिफिकेशन मिळाले आहे, त्यामुळे या फोनचा भारतीय लाँच निश्चित झाला आहे.  

Xiaomi 12 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

लिक्स आणि रिपोर्ट्समधून Xiaomi 12 ची माहिती समोर आली आहे. त्यानुसार या फोनमध्ये LTPO डिस्प्ले अ‍ॅडेप्टिव रिफ्रेश रेटसह देण्यात येईल. वर सांगितल्याप्रमाणे यात Qualcomm Snapdragon 898 चिपसेट मिळेल.त्याचबरोबर 12GB पर्यंतचा LPDDR5x RAM आणि 512GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज देण्यात येईल. हा मोबाईल Android 12 आधारित MIUI वर चालेल. तसेच यातील 5000mAh ची बॅटरी 120W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.  

मिळलेल्या दिलेल्या माहितीनुसार आगामी Xiaomi फ्लॅगशिप सीरीजमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल. त्याचबरोबर 50MP चा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह येतील. तसेच यात 1920fps स्लो मोशन व्हिडीओ शूट करण्याचा पर्याय मिळेल.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान