शाओमी नेहमीच आपल्या स्वस्त स्मार्टफोन्ससाठी चर्चेत असते. परंतु गेले काही वर्ष कंपनीनं प्रीमियम रेंजमध्ये देखील आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीचा गेल्यावर्षी आलेला Xiaomi 11 Ultra अनेक टेक प्रेमींसाठी ड्रीम फोन ठरला होता. आता त्या यशाची पुनरावृत्ती Xiaomi 12 Ultra च्या माध्यमातून शाओमी करू शकते.
Xiaomi 12 Ultra चे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. हा फोन सात रियर कॅमेऱ्यांसह बाजारात येऊ शकतो. यातील मुख्य कॅमेरा 200MP चा असू शकतो. हा फोन इंडस्ट्रीमधील पहिला फोन असेल, ज्यात 200MP चा कॅमेरा मिळेल. काही रिपोर्ट्सनुसार हा मान Motorola च्या एका स्मार्टफोनला मिळू शकतो, कोणाला यश मिळेल हे येत्या काळात समजेल.
संभाव्य स्पेक्स आणि फीचर्स
शाओमीच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या इमेजेस समोर आल्या आहेत, ज्यात फोनच्या मागे 7 कॅमेरे दिसले आहेत. Nokia च्या पेंटा अर्थात पाच रियर कॅमेरा असलेला फोननंतर Xiaomi चा 7 कॅमेरे असलेला फोन बाजारात येऊ शकतो. कंपनीनं मात्र या स्मार्टफोनची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. हा फोन यावर्षीच्या अखेरीस सादर केला जाऊ शकतो.
रिपोर्टनुसार, Xiaomi च्या या स्मार्टफोनचे नाव Xiaomi 12 Ultra असू शकतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1+ प्रोसेसर दिला जाऊ शकतो. Xiaomi 12 Pro प्रमाणेच फोनमध्ये 12GB RAM आणि 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळू शकतो. तसेच फोनमध्ये 200MP असलेला Sony IMX800 सेन्सर असण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, Xiaomi 12 Ultra च्या मागे दोन अल्ट्रा वाईड सेन्सर आणि दोन टेलीफोटो सेन्सर दिले जातील. तसेच फोनमध्ये एक पेरीस्कोप सेन्सर मिळू शकतो. उर्वर्वरित दोन कॅमेरे डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर असू शकतात. या 7 सेन्सर्ससह ड्युअल LED फ्लॅश देखील मिळू शकतो. आगामी Xiaomi 12 Ultra मध्ये कंपनी 200MP चा प्रायमरी सेन्सर देऊ शकते. कॅमेरा सेगमेंटसाठी शाओमी ZEISS सोबत भागेदारी करू शकते.