शाओमीची ओळख कमी किंमतीत चांगले स्पेक्स आणि फीचर्स असलेले फोन्स सादर करणारी स्मार्टफोन कंपनी अशी आहे. परंतु त्याचबरोबर कंपनी प्रीमियम सेगमेंटमध्ये देखील जबरदस्त फोन्स सादर करू शकते हे कंपनीने Xiaomi Mi 11 Ultra च्या माध्यमातून दाखवून दिले आहे. आता कंपनी आपल्या प्रीमियम स्मार्टफोनचा दर्जा अजून उंचावण्याची तयारी करत आहे. Xiaomi 12 सीरीजच्या समोर आलेल्या स्पेक्सवरून हा अंदाज लावला जात आहे.
Xiaomi 12 सीरीजचे लीक स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 12 series यावर्षीच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला सादर केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये कंपनी दोन स्मार्टफोन सादर करणार आहे, अशी माहिती टिप्सटर Digital Chat Station ने दिली आहे. या स्मार्टफोनपैकी एक Xiaomi 12 Ultra नावाने बाजारात येईल. मिळलेल्या दिलेल्या माहितीनुसार आगामी Xiaomi फ्लॅगशिप सीरीजमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या दोन्ही फोन्समध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल. त्याचबरोबर 50MP चा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो.
लिक्सनुसार Xiaomi च्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स मोठ्या प्रमाणावर अपग्रेड केले जातील. यात 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगचा देखील समावेश असू शकतो. तसेच कंपनी डिस्प्लेसाठी LTPO 120Hz AMOLED पॅनलचा वापर करू शकते.
कंपनी Xiaomi 12 चा स्टँडर्ड व्हेरिएंट Qualcomm Snapdragon Summit मध्ये सादर करू शकते. हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 898 SoC सह सादर केला जाईल. हा प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा आगामी सर्वात शक्तिशाली प्रोसेसर आहे.