Xiaomi 12 Series या महिन्याच्या अखेरीस लाँच करण्यात येईल. ही कंपनीची फ्लॅगशिप सीरिज असेल, जी तीन शानदार स्मार्टफोनसह सादर केली जाईल. Xiaomi 12 सीरीजमध्ये Xiaomi 12, Xiaomi 12X आणि Xiaomi 12 Pro मॉडेल सर्वप्रथम चीनमध्ये येतील. यातील Xiaomi 12 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 या फ्लॅगशिप प्रोसेसरसह येईल, असं कंपनीनं आधीच सांगितलं आहे.
चीनी टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वरून या तिन्ही मॉडेलची माहिती दिली आहे. त्यानुसार हे तिन्ही फोन L3A, L3 आणि L2 कोडनेमसह स्पॉट करण्यात आले आहेत. हे तिन्ही शाओमी फोन Xiaomi 12X, Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro असू शकतात. जे कंपनी 28 डिसेंबरला लाँच करू शकते.
Xiaomi 12 सीरिजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
1 डिसेंबरला शाओमीनं Xiaomi 12 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC असेल, असं सांगितलं होता. त्यामुळे हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन असेल. याआधी आलेल्या माहितीनुसार Xiaomi 12 मध्ये 50MP कॅमेरा रियर कॅमेरा मिळेल. तसेच यात 100W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. याव्यतिरिक्त इतर कोणत्याची फोन्सच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती मिळाली नाही. परंतु या फोन्समध्ये देखील क्वॉलकॉमचा प्रोसेसर मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लाँचपूर्वी फोन्सची सविस्तर माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे.