चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi आपल्या दमदार स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील युजर्ससाठी सातत्याने कंपनी विविध प्रोडक्ट लाँच करत असते. शाओमीने भारतीय बाजारात ही चांगलाच जम बसविला असून भारतात शाओमीचे फोन्स हे सर्वाधिक विकले जातात. शाओमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) लेई जून (Lei Jun) हे कोणत्या फोनचा वापर करतात हे आता नेटिझन्सनीच एका पोस्टमधून शोधून काढलं आहे. जून हे आयफोनचा वापर करत असून त्याचा वापर करताना पकडले गेले आहेत. एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. लेई जून यांनी सोशल मीडियावर आयफोनवरून एक पोस्ट केली होती. मात्र त्याची ही पोस्ट नेटिझन्सच्या नजरेस पडली आणि ते आयफोन वापरत असल्याचं बरोबर हेरलं.
शाओमीच्या सीईओनाही Apple ची भुरळ पडली आहे. स्वतःच्या कंपनीचा फोन न वापरता Apple वर अवलंबून असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तसेच चूक लक्षात येताच जून यांनी ती पोस्ट त्वरीत डिलीट केली मात्र तो पर्यंत ती जोरदार व्हायरल झाली होती. त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला असून शाओमीच्या फोनपेक्षा आयफोन कसा चांगला आणि बेस्ट आहे याचीच चर्चा सर्वत्र रंगली. याआधीही अनेकदा अँड्रॉईड स्मार्टफोन कंपनीचे अनेक अधिकारी आयफोन वापरत असताना पकडले गेले आहेत. काहींनी कंपनीचा फोन न वापरण्यावरून जून यांच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्यांची बाजू घेतल्याचं दिसून येत आहे.
शाओमी उद्योग गुंतवणूक विभागाचे भागीदार असलेल्या पॅन जियूटांग यांनी जून यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 'स्मार्टफोन कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी हे प्रतिस्पर्धी ब्रँडच्या माहितीसाठी, भविष्यातील कल्पकतेसाठी Apple आणि सॅमसंग यासारख्या इतर कंपन्यांचा वापर करतात' असं पॅन यांनी म्हटलं आहे. अनेक कंपन्याचे सीईओ आयफोन वापर करत असताना पकडले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी Realme India चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव शेठ यांनाही अशाच गोष्टीचा सामना करावा लागला होता. त्यांनी आपल्या कंपनीच्या फोन्सची माहिती देणारं ट्विट हे आयफोवरून केलं होतं. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 'झिंक आणि गरम पाण्याने कोरोनाग्रस्त बरे झाले', डॉक्टरचा दावा
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेलं 'Y2K' नेमकं आहे तरी काय?
CoronaVirus News : बापरे! ज्याच्या घरात चोरी केली तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मग...
CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट
CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"
CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...
CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल