शाओमी आपली नवीन कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन सीरिज सादर करणार आहे. या सीरिजचा नवीन Xiaomi Civi नवीन स्मार्टफोन 27 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी 11 वाजता लाँच केला जाणार आहे. कंपनीने आपल्या विबो अकॉउंटवरून या स्मार्टफोनची माहिती दिली आहे. सध्या ही सीरिज चीनमध्ये सादर करण्यात येईल आणि ही सीरिज कंपनीच्या जुन्या Xiaomi CC सीरीजची जागा घेईल, अशी चर्चा आहे.
Xiaomi Civi ची डिजाइन
शाओमीने विबोवर एक टीजर व्हिडीओ आणि पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टमधून Xiaomi Civi स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती समोर आली आहे. हा फोन बॅक पॅनलवर अँटी ग्लेयर ग्लास डिजाइनसह सादर केला जाईल. तसेच फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात एक USB Type C चार्जिंग पोर्ट, एक सिम कार्ड स्लॉट आणि एक स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे.
लिक्सनुसार Xiaomi Civi खूप स्लिम असेल आणि फोनच्या बॉक्समध्ये चार्जर दिला जाणार नाही. तसेच मॉडेल नंबर 2017119DC असलेला हा फोन 90Hz रिफ्रेश रेट असलेल्या AMOLED डिस्प्लेसह बाजारात येईल. TENAA लिस्टिंगनुसार या फोनचे स्पेक्स जागतिक बाजारातील Xiaomi 11 Lite 5G NE सारखे आहेत. Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778 SoC, 8GB RAM आणि 256GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. तसेच Xiaomi 11 Lite 5G NE मध्ये 4,250mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Xiaomi Civi चे स्पेसिफिकेशन्स असेच काहीसे असू शकतात.