नवी दिल्ली : स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये सध्या ड्यूअल, ट्रिपल आणि क्वाड रिअर कॅमेराचे स्मार्टफोनची चलती आहे. मोबाईल निर्मात्या कंपन्या काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात नेहमीच असतात. अगदी 10-15 दिवसांनी बाजारात नवा स्मार्टफोन आणला जात आहे. यामुळे ग्राहकांनाही याच काळात त्यांचा नवा मोबाईल जुना झाल्यासारखे वाटते. आता 108 मेगापिक्सलच्या फोनची चर्चा असताना शाओमीने तब्बल 7 कॅमेऱ्यांचा पॉपअप पेटंटसाठी अर्ज केला आहे.
पेटंटमध्ये देण्यात आलेल्या फोटोमध्ये नव्या स्मार्टफोनमध्ये सात कॅमेरे दिसत आहेत. मात्र, या फोनचे नाव आणि अन्य फिचर्सबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
शाओमी Mi 10 5G लाँच करण्याच्या तयारीला लागली आहे. पुढील महिन्यात हा फोन लाँच होईल. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 5G चिपसेट आहे. या चिपसेटमध्ये येणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. याची घोषणा क्वालकॉमने Snapdragon Tech Summit 2020 मध्ये केली होती.