Xiaomi चं नाव ज्यांच्या हातात स्मार्टफोन आहे त्यांनी कधी कधी ऐकलंच असेल. ही भारतातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. परंतु आता शाओमी संबंधित धक्कादायक बातमी समोर आली आहे. चुकीची जाहिरात केल्यामुळे शाओमीला सुमारे अडीच लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीवर ही कारवाई होम मार्केट म्हणजे चीनमध्ये करण्यात आली आहे.
पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या मार्केट सुपरविजन डिपार्टमेंटनं शाओमीवर जाहिरात कायद्याचं उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर डिपार्टमेंटनं कंपनीला दंड देखील ठोठावला आहे. चुकीची जाहिरात दिल्यामुळे आता कंपनीला 20,000 युआन म्हणजे जवळपास 2,36,000 रुपये दंड भरावा लागणार आहे.
Xiaomi नं टीमॉल नावाच्या एका शॉपिंग साईटवर Redmi K30 5G या स्मार्टफोनची जाहिरात प्रकाशित केली होती. या जाहिरातीत फोनचं प्रोमोशन करताना फोनच्या स्पेसिफिकेशन्सची चुकीची माहिती देण्यात आली होती. रिपोर्टनुसार, कथित जाहिरातीत Redmi K30 5G Phone मध्ये Samsung च्या अॅमोलेड डिस्प्लेचा वापर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु शाओमीचा हा स्मार्टफोन अॅमोलेड नव्हे तर एलसीडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे.
फोनचे स्पेसिफिकेशन्स चुकीचे सांगितल्यामुळे शाओमीवर हा आरोप करण्यात आला आहे. तसेच चीनच्या सरकारी विभागानं कंपनीला दंड ठोठावला आहे. कंपनीनं यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानुसार ही एक नकळत झालेली चूक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हे देखील वाचा:
5G ची प्रतिक्षा संपणार! दूरसंचार विभागाने या शहरांत थेट लाँचिंगची केली घोषणा, महाराष्ट्राचाही समावेश
खुशखबर! iPhone स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; Apple प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट