शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

Xiaomi फॅन्सना जोरदार झटका! या कारणामुळे कंपनीने सर्वात पॉवरफुल फोनची विक्री केली बंद 

By सिद्धेश जाधव | Published: October 30, 2021 12:20 PM

Xiaomi Mi 11 Ultra Price In India: शाओमीने आपला अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन Mi 11 Ultra ची भारतातील विक्री बंद केली आहे. हा फोन मर्यादित क्वॉन्टिटीमध्ये उपलब्ध होता, त्यामुळे उपलब्ध स्टॉक संपल्यावर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

शाओमीने भारतात आपल्या सर्वात पॉवरफुल फोनची विक्री बंद केली आहे. कंपनी एप्रिलमध्ये देशात आलेला Mi 11 Ultra आता विकणार नाही. हा फोन मर्यादित प्रमाणात उपलब्ध करवण्यात आला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या फोनचा स्टॉक संपल्यानंतर Xiaomi ने हा फोन पुन्हा न मागवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती इंडिया टुडेच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.  

Mi 11 Ultra भारतात बंद करण्याचे कारण  

रिपोर्टनुसार, 2022 मध्ये येणाऱ्या फ्लॅगशिप फोन्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. तसेच गेले कित्येक दिवस भारतात Mi 11T Pro स्मार्टफोन येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. हा देखील शाओमीचा फ्लॅगशिप फोन आहे. परंतु हा मी 11अल्ट्रा प्रमाणे अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन नाही. कंपनी Mi 11 Ultra देशात बनवत नव्हती, हा फोन चीनमधून आयात करावा लागत असल्यामुळे या फोनची किंमत देखील जास्त होती. या फोनचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले होते. इतर स्पेक्स तर फ्लॅगशिप लेव्हल होतेच परंतु Mi 11 Ultra ची खासियत या फोनच्या मागे मिळणारा छोटा सेकंडरी डिस्प्ले ही होती. 

आगामी Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स    

Xiaomi 11T Pro या सीरिजमधील पॉवरफुल फोन आहे. स्पेसिफिकेशन्समधून देखील ही पॉवर दिसून येते. कारण या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे.     

या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. बेस मॉडेलप्रमाणे या फोन मध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.   

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान