स्मार्टफोन ग्राहकांना एकामागून एक स्मार्टफोन कंपन्या झटके देत आहेत. शाओमी, रियलमी, ओपो आणि सॅमसंगने आपल्या स्मार्टफोनच्या किंमती गेल्या काही दिवसांत वाढवल्या आहेत. आज आपण गेल्या काही दिवसांत किंमत वाढलेल्या Redmi स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत. Xiaomi चे Redmi 9, Redmi 9 Power, Redmi 9 Prime, Redmi 9i, Redmi Note 10T 5G, आणि Redmi Note 10S हे स्मार्टफोन गेल्या काही दिवसांत महागले आहेत.
साधारणतः स्मार्टफोन कंपन्या जुन्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करतात. जेणेकरून त्याजागी येणाऱ्या नव्या स्मार्टफोनची मागणी वाढावी. परंतु सध्या भारतीय बाजारात उलटेच चित्र दिसत आहे. कंपन्यांनी या दरवाढीच्या मागचे कोणतेही कारण अधिकृतपणे सांगितलेले नाही. शाओमीने ज्या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे त्यातील जास्तीत जास्त स्मार्टफोन बेस मॉडेल्स आहेत. कंपनीने या स्मार्टफोन्सच्या किंमतीत 300 ते 500 रुपयांची वाढ केली आहे. चला जाणून घेऊया या सर्व स्मार्टफोनची नवीन किंमत.
स्मार्टफोन मॉडेल | जुनी किंमत | झालेली वाढ | नवीन किंमत |
---|---|---|---|
Redmi 9 4GB + 64GB | 8,999 | 500 | 9,499 |
Redmi 9 Power 4GB + 64GB | 10,999 | 500 | 11,499 |
Redmi 9 Prime 4GB + 64GB | 9,999 | 500 | 10,499 |
Redmi 9i 4GB + 64GB | 8,499 | 300 | 8,799 |
Redmi Note 10T 5G 4GB + 64GB | 14,499 | 500 | 14,999 |
Redmi Note 10T 5G 6GB + 128GB | 16,499 | 500 | 16,999 |
Redmi Note 10S 6GB + 128GB | 15,999 | 500 | 16,499 |