Xiaomi ने Mi Watch Revolve Active च्या लाँच डेटची घोषणा केली आहे. कंपनी 22 जूनला भारतात हा स्मार्टवॉच लाँच करेल.
या स्मार्टवॉचच्या लाँचची माहिती कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. 22 तारखेला कंपनी भारतात आपला नवीन फोन Mi 11 Lite देखील लाँच करणार आहे. त्यामुळे हे दोन्ही डिवाइस दुपारी 12 वाजता लाँच केले जातील. यातील Mi 11 Lite फ्लिपकार्टवर तर Mi Watch Revolve Active अमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल.
हा वॉच कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे, या लिस्टिंगमध्ये काही महत्वाचे फीचर्स समोर आले आहेत. या वर्तुळाकार वॉचच्या उजवीकडे दोन बटन्स देण्यात आले आहेत. तसेच यात, हेल्थ ट्रॅकिंग आणि हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम SpO2 ऑक्सिजन मॅपिंगसह देण्यात येईल. त्याचबरोबर यात VO2 मॅक्स ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटर आणि बॉडी एनर्जी मॉनिटर असे फीचर्स देखील असतील.
Mi Watch Revolve चे स्पेसिफिकेशन्स
यापूर्वी कंपनीने सप्टेंबर 2020 मध्ये Mi Watch Revolve भारतात लाँच केला होता. हा चिनी Mi Watch Color स्मार्टवॉचचा रिब्रँडेड व्हर्जन होता. त्याचप्रमाणे Mi Watch Revolve Active पण युरोपात लाँच झालेल्या Mi Watch चा रिब्रँडेड व्हर्जन असेल, अशी चर्चा आहे.