Xiaomi ने आपल्या होम मार्केटमध्ये नवीन इंडक्शन कुकर सादर केला आहे. हा कुकर MIJIA Ultra-thin Induction Cooker नावाने लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीने एप्रिलमध्ये आपला Mijia Induction Cooker भारतात टीज केला होता. परंतु चीनमध्ये आता लाँच झालेला नवीन इंडक्शन कुकर कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि बेस्ट इंडक्शन कुकर असल्याचे सांगण्यात आले आहे.
शाओमीने आपल्या इंडक्शन कुकरच्या लाईनपमधील हा तिसरा MIJIA Ultra-thin Induction Cooker अगदी कॉम्पॅक्ट आणि स्टायलिश डिजाईनसह सादर केला आहे. या कुकरची किंमत 499 युआन ठेवण्यात आली आहे, ही किंमत जवळपास 5,722 रुपयांमध्ये रूपांतरित होते. या कुकरची प्री-बुकिंग चीनमध्ये ई-कॉमर्स साईट JD.com वर सुरु करण्यात आली आहे.
MIJIA Ultra-thin इंडक्शन कुकरची जाडी फक्त 23mm इतकी आहे. ही जाडी प्लेटपेक्षाही खूप कमी आहे असा दावा शाओमीने केला आहे. याचा आकार 350x280x23mm इतका आहे तर वजन 2.3 किलोग्रॅम आहे. या कुकर सोबत 1.2 मीटर लांब पावर कॉर्ड देण्यात आली आहे.
शाओमीचा हा इंडक्शन कुकर हिट-रेजिस्टन्स पेंटसह सादर करण्यात आला आहे. हा अल्ट्रा-थिन इंडक्शन कूकर 100W लो-पावर हीटिंगला सपोर्ट करतो. कंट्रोल्सच्या मदतीने याची फायरपावर 99 लेव्हल्सवर नियंत्रित करता येते. यात XiaoAI आणि NFC अॅप सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात एक ओएलईडी नॉब देण्यात आला आहे.