Xiaomi भारतात दोन नवीन Redmi स्मार्टफोन लाँच करणार असल्याची बातमी समोर आली आहे. कंपनी लवकरच Redmi 9 Activ आणि Redmi 9A Sport असे दोन बजेट सेगमेंटमधील फोन देशात लाँच करू शकते. यातील Redmi 9 Activ च्या लाँचची माहिती कंपनीने आपल्या ट्विटर अकॉउंट वरून दिली आहे. हा फोन उद्या म्हणजे शुक्रवारी 24, ऑगस्टला सादर केला जाईल. तत्पूर्वी MySmartPrice ने या दोन्ही स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली होती. Redmi 9 Activ आणि Redmi 9A Sport हे दोन्ही फोन जुन्या Redmi 9 आणि Redmi 9A पेक्षा थोडे वेगळे असतील. हे दोन्ही स्मार्टफोन नवीन रॅम आणि स्टोरेजसह सादर केले जातील.
Redmi 9 Activ चे संभाव्य स्पेक्स
Redmi 9 Activ स्मार्टफोन नवीन मेटॅलिक पर्पल कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. हा फोन 4GB RAM+ 64GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये Redmi 9 Prime स्मार्टफोन प्रमाणे MediaTek Helio G35 SoC मिळू शकते. तसेच Redmi 9 Activ स्मार्टफोन 6.53-इंचाच्या HD+ डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. फोनमध्ये 13MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. तसेच या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल. हा फोन अॅमेझॉन इंडिया, mi.com, मी होम आणि मी स्टुडिओच्या माध्यमातून विकत घेता येईल.
Redmi 9A Sport चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Redmi 9A Sport स्मार्टफोन मेटॅलिक ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. हा रेडमी फोन 2GB + 32GB, आणि 3GB + 32GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. Redmi 9 स्मार्टफोन प्रमाणे यातील स्पेक्स असतील. तसेच हा फोन MediaTek Helio G25 SoC सह सादर केला जाईल. हा फोन 13MP रियर कॅमेरा आणि 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या रेडमी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.