Xiaomi ने आज भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 10 Prime गेमिंग चिपसेटसह लाँच केला आहे. त्याचबरोबर कंपनीने ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत नवीन ट्रू वायरलेस इयरबड्स देखील सादर केले आहेत. Redmi Earbuds 3 Pro नावाने भारतात सादर झालेले हे बड्स चीनमधील Redmi AirDots 3 इयरबड्सचे रिब्रँड व्हर्जन आहेत.
Redmi Earbuds 3 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Earbuds 3 Pro इयरबड्समध्ये क्वॉलकॉमचा एंट्री लेव्हल QCC3040 चिपसेट देण्यात आला आहे. चांगल्या ऑडिओ क्वॉलिटीसाठी यात ड्युअल ड्रायव्हर देण्यात आले आहेत. हे बड्स Bluetooth 5.2 कनेक्टिविटीला सपोर्ट करतात. या इयरबड्समध्ये गेमिंग मोड मिळतो, ज्यात लो लेटेंसीसह बॅलन्सड ऑडिओ मिळतो.
Redmi Earbuds 3 Pro मल्टी फंशनल टच कंट्रोल देण्यात आला आहे. तसेच यात वीयर डिटेक्शन देखील मिळतो. यातील इंफ्रारेड (IR) सेन्सर इयरबड्स कानातून काढले कि म्यूजिक पॉज करतो. चार्जिंग केससह या बड्समध्ये एकूण बॅटरी 600mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी एकूण 30 तासांचा बॅटरी बॅकअप देते. हे बड्स USB Type-C पोर्टने चार्ज करता येतील. एका इयरबड्समध्ये 43mAh ची बॅटरी आहे जी 7 तासांचा बॅकअप देते. तसेच Redmi Earbuds 3 Pro IPX4 रेटिंगसह सादर करण्यात आले आहेत.
Redmi Earbuds 3 Pro ची किंमत
Redmi Earbuds 3 Pro इयरबड्सची किंमत कंपनीने 2,999 रुपये ठेवली आहे. हे रेडमी इयरबड्स ब्लू, पिंक आणि व्हाइट कलरमध्ये विकत घेता येतील. 9 सप्टेंबरपासून हे इयरबड्स Amazon, Mi.com, Mi Home stores, आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर खरेदीसाठी उपलब्ध होतील.