Xiaomi भारतात लवकरच Mi आणि Redmi ब्रँडअंतगर्त नवीन लॅपटॉप्स लाँच करू शकते. समोर आलेल्या ताज्या लीकनुसार कंपनी भारतातील लॅपटॉप पोर्टफोलियो वाढवण्याची योजना बनवत आहे. यापूर्वी कंपनीने भारतात Mi Notebook 14, Mi Notebook 14 Horizon Edition, Mi Notebook 14 IC आणि Mi Notebook 14 e-Learning Edition लॅपटॉप लाँच केले आहेत.
Xiaomi मी ब्रँड अंतगर्त भारतात लवकरच नवीन लॅपटॉप घेऊन येणार असल्याची माहिती ईशान अग्रवालने दिली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत Redmi ब्रँड अंतगर्त देखील लॅपटॉप लाँच केला जाऊ शकतो. हा रेडमी ब्रँडचा भारतातील पहिला लॅपटॉप असेल. शाओमीने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
कंपनी मी आणि रेडमी ब्रँड अंतगर्त चीनमध्ये अनेक लॅपटॉप सादर केले आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने चीनमध्ये Mi Notebook Pro X 15 लॅपटॉप 11th-generation Intel CPUs आणि लेटेस्ट Nvidia GeForce RTX 30 सीरीज जीपीयूसह सादर केला होता. तर फेब्रुवारीमध्ये RedmiBook Pro 14 आणि RedmiBook Pro 15 मॉडेल्स लाँच करण्यात आले होते.