शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

Xiaomi चा शानदार स्मार्टफोन झाला लाँच; स्नॅपड्रॅगन 732G, 8GB रॅमसह भारतात आला Mi 11 Lite  

By सिद्धेश जाधव | Published: June 22, 2021 1:09 PM

Xiaomi Mi 11 Lite India launch: Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनमध्ये Snapdragon 732G चिपसेट, 33W 4,250mAh बॅटरी आणि 64MP रियर कॅमेरा असे फीचर्स देण्यात आले आहेत.  

Xiaomi ने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन Mi 11 Lite लाँच केला आहे. शाओमी मी 11 लाइट 2021 मधील सर्वात स्लीक आणि लाइट स्मार्टफोन आहे, असा दावा शाओमीने केला आहे.  मिड बजेट सेगमेंटमध्ये असलेल्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 732G चिपसेट, 33W 4,250mAh बॅटरी आणि 64MP रियर कॅमेरा असे फीचर्स आहेत.  

Xiaomi Mi 11 Lite चे स्पेसिफिकेशन्स 

Mi 11 Lite मध्ये बेजल लेस पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. 6.55 इंचाचा हा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. या डिस्प्लेमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. तसेच याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.  

अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच करण्यात आलेला Mi 11 Lite मीयुआय 12 सह चालतो. या फोनमध्ये Qualcomm® Snapdragon 732G चिपसेट आणि एड्रेनो 618 जीपीयूला देण्यात आला आहे. शाओमीचा हा फोन 6GB+128GB आणि 8GB+128GB अश्या दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे.  

Xiaomi Mi 11 Lite मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स मिळते. मी 11 लाइट 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 

मी 11 लाइट मध्ये शाओमीने 4,250mAh ची बॅटरी दिली आहे. हि बॅटरी 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते. हा फोन फक्त 30 मिनिटांत 0 वरून 59 टक्के चार्ज होऊ शकतो. विशेष म्हणजे 33W Fast charger फोनसोबत बॉक्समध्ये देण्यात आला आहे.  

Xiaomi Mi 11 Lite ची किंमत 

Xiaomi Mi 11 Lite भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या छोट्या व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, या मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. तसेच, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मी 11 लाइट 28 जूनपासून mi.com, Mi Home,  फ्लिपकार्ट आणि रिटेलस स्टोर्सवरून विकत घेता येईल. तुम्ही हा 25 जूनपासून प्री-ऑर्डर करू शकता.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान