चीनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने गेल्या महिन्यात भारतात Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन लाँच केला होता. आता या फोनचा अजून एक व्हर्जन भारतात सादर करण्याची तयारी कंपनी करत असल्याचे दिसत आहे. हा स्मार्टफोन Xiaomi Mi 11 Lite NE नावाने भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकतो. लाँचपूर्वी हा स्मार्टफोन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. त्यामुळे हा फोन लवकरच भारतात सादर होण्याची शक्यता वाढली आहे.
Xiaomi Mi 11 Lite NE स्मार्टफोन मॉडेल नंबर – 2109119DG सह इन्फोकॉम मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी या सिंगापूरच्या वेबसाईटवर दिसला होता. त्याआधीच या मॉडेलला बीआयएस कडून सर्टिफिकेशन मिळाले आहे. हा स्मार्टफोन भारतात सप्टेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. Xiaomi Mi 11 Lite NE अलीकडेच सादर झालेल्या Mi 11 Lite चा 5G व्हर्जन असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
Mi 11 Lite 5G चे स्पेसिफिकेशन्स
Mi 11 Lite 5G जागतिक बाजारात लाँच झाला आहे, त्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. Mi 11 Lite 5G स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 780 SoC सह येणार जगातील पहिला स्मार्टफोन आहे. यात 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
Xiaomi Mi 11 Lite 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स मिळते. हा फोन 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने 4,250mAh ची बॅटरी दिली आहे.