Xiaomi आपल्या आगामी Mi 11T आणि Mi 11T Pro स्मार्टफोन्सवर काम करत आहे. हे फोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro या दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची जागा घेतील. आता या Mi 11T आणि Mi 11T Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. Xiaomiui ने आपल्या ट्वीटर हँडलवरून आगामी Mi 11T स्मार्टफोनच्या मुख्य स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.
Xiaomiui ने दिलेल्या माहितीनुसार, Xiaomi Mi 11T स्मार्टफोनचे कोडनेम Amber आहे. हा फोन 20:9 अस्पेक्ट रेशयो आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेसह सादर केला जाईल. या फोनमध्ये मीडियाटेकचा चिपसेट असू शकतो. तसेच या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64-मेगापिक्सल OmniVision OV64B चा मुख्य कॅमेरा, Sony IMX355 वाईड लेन्स आणि 3x झूम सपोर्टसह टेलीफोटो कॅमेरा देण्यात येईल. शाओमी हा स्मार्टफोन ग्लोबल आणि भारतीय बाजारात लाँच करेल.
हे देखील वाचा: तब्बल दोन महिने चालणार या फोनची बॅटरी; JioPhone ला टक्कर देणार का Philips चे तीन फिचर फोन
Redmi K40 Ultra सारखे आहेत स्पेक्स
या स्मार्टफोन सारखे स्पेक्स असलेला एक फोन चीनमध्ये Redmi K40 Ultra नावाने लाँच करण्यात आला आहे. Agate कोडनेम असलेला हा फोन देखील 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि 120Hz रिफ्रेश रेट असेलल्या डिस्प्लेसह येतो. या रेडमी स्मार्टफोनमध्ये MediaTek के प्रोसेसर देण्यात आला आहे. फक्त ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमधील मुख्य कॅमेरा 108-मेगापिक्सलचा Samsung HM2 सेन्सर आहे. सेकंडरी सेन्सर Sony IMX355 वाईड अँगल लेन्स आणि तिसरा कॅमेरा 3x झूम असलेला टेलीफोटो कॅमेरा मात्र सामान आहेत.
हे देखील वाचा: रिलायन्स, अॅमेझॉनला मिळणार टाटांच्या सुपर अॅपकडून आव्हान; तुमचे जीवन बदलणार का सुपर अॅप?
Xiaomi Mi 11T स्मार्टफोनचा ग्लोबल व्हेरिएंट मॉडेल नंबर 21081111RG सह इंडोनेशियन सर्टिफिकेशन साइटवर दिसला होता. त्यानुसार या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 1200 चिपसेट दिला जाऊ शकतो. Mi 11T series ग्लोबल आणि भारतीय बाजारात ऑक्टोबरमध्ये सादर केली जाऊ शकते.