शाओमी 200MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनवर काम करत असल्याची माहिती याआधी देखील समोर आली आहे. शाओमी मी 12 स्मार्टफोन 200MP कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो. हा 200MP ISOCELL स्मार्टफोन कॅमेरा सेन्सर सॅमसंगद्वारे बनवण्यात येत आहे. आता या फोनच्या लाँचची माहिती समोर आली आहे. लीक रिपोर्टनुसार, Mi 12 स्मार्टफोन यावर्षीच्या शेवटी लाँच केला जाऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर असेल.
मी 12 क्वालकॉम नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप प्रोसेसरसह लाँच केला जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. निर्धारित वेळेच्या महिनाभर आधी क्वालकॉम नवीन प्रोसेसर लाँच करू शकते. तसेच शाओमी आणि क्वालकॉमने याआधी देखील फ्लॅगशिप प्रोसेसरसाठी भागेदारी केली आहे. त्यामुळे मी 12 स्मार्टफोन देखील यावर्षी निर्धारित वेळेच्या आधी लाँच केला जाऊ शकतो.
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 895 प्रोसेसर डिसेंबरपूर्वी लाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती टिप्सटर Ice Universe ने चीनी माइक्रो ब्लॉगिंग साइट वीबोवर माहिती लीक केली आहे. स्नॅपड्रॅगन 895 अधिकृतपणे सादर झाल्यानंतर Xiaomi आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi 12 सादर करू शकते. या स्मार्टफोनमध्ये नवीन आणि शक्तिशाली प्रोसेसरसह 200 मेगापिक्सलचा कॅमेरा देखील मिळू शकतो. ऑलिम्पस आणि सॅमसंग या कॅमेऱ्यावर काम करत आहेत.