शाओमी लवकरच आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज सादर करू शकते. ही सीरिज Xiaomi Mi 12 नावाने बाजारात येईल. आता या सीरिजच्या डिजाईनची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार आगामी Xiaomi Mi 12 सीरीज नुकत्याच लाँच झालेल्या सिवि सीरीजच्या डिजाइनसह सादर केली जाऊ शकते. तसेच Mi 11 सीरीजपेक्षा Mi 12 स्मार्टफोन सीरिज हलकी आणि स्लिम असेल.
Xiaomi Mi 12 ची डिजाइन
आगामी Xiaomi Mi 12 स्मार्टफोन ड्युअल कोर मटेरियल आणि डिजाइनसह सादर केला जाईल. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. इतकी मोठी बॅटरी असूनही या फोनचे वजन कमी ठेवण्यात येईल. तसेच आकाराने हा फोन स्लिम असेल. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये Mi MIX 4 प्रमाणे क्रेमिक बॅक पॅनलचा वापर करण्यात येईल.
टिपस्टर Digital Chat Station ने दिलेल्या माहितीनुसार, Xiaomi Mi 12 स्मार्टफोनमध्ये खूप पातळ बेजल दिले जातील. तसेच या फोनमधील चीन पार्ट देखील खूप छोटा असेल. त्यामुळे व्हिडीओ आणि मूवी बघण्याचा चांगला अनुभव मिळवता येईल. तसेच हा स्मार्टफोन कर्व एज डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो. या फोनचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो देखील वाढवला जाऊ शकतो.
Xiaomi Mi 12 स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 12 स्मार्टफोनमध्ये 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर मिळू शकतात. ज्यात मुख्य कॅमेरा, अल्ट्रा वाईड लेन्स आणि टेलीफोटो लेन्सचा समावेश असेल. तसेच कंपनी 10x पेरिस्कोप लेन्सवर देखील काम करत आहे, असे टिपस्टरने सांगितले आहे. परंतु, Xiaomi 12 मधील 50MP च्या टेलीफोटो लेन्ससह 5x पेरिस्कोप लेन्स मिळू शकते.
असा कॅमेरा सेटअप खूप कमी स्मार्टफोन्समध्ये मिळतो. 50MP च्या पेरिस्कोप लेन्सला सपोर्ट करणारा Xiaomi 12 पहिलाच स्मार्टफोन असू शकतो. याआधी काही रिपोर्ट्स मध्ये दावा केला जात आहे कि यात 200 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.
Xiaomi 12 स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. ज्यात नवीन LPDDR5X रॅमचा समावेश असले. या टेक्नॉलॉजीची घोषणा JEDEC कंपनीने काही महिन्यांपूर्वी केली आहे. तसेच या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 898 प्रोसेसर मिळू शकतो. क्वॉलकॉमने अजून या प्रोसेसरची घोषणा केली नाही. या वर्षाच्या अखेर हा प्रोसेसर आल्यास पुढील वर्षाच्या सुरुवातीला Xiaomi 12 ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो.