स्मार्टफोन चिपसेट बनवणारी कंपनी Qualcomm ने गेल्या आठवड्यात नेक्स्ट जेनेरेशन फ्लॅगशिप चिपसेटची माहिती दिली होती. कोडनेम sm8450 सह येणारा हा दमदार चिपसेट बाजारात Snapdragon 895 नावाने पदार्पण करू शकतो. कंपनी हा चिपसेट यावर्षी डिसेंबरमध्ये लाँच करू शकते. Snapdragon 895 चिपसेटसह येणारा सर्वात पहिला स्मार्टफोन Xiaomi Mi 12 असेल, असा दावा याआधी आलेल्या अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. परंतु आता Xiaomi Mi 12 स्मार्टफोनची अजून स्पष्ट माहिती समोर आली आहे.
प्रसिद्ध टिपस्टर Digital Chat Station ने सांगितले आहे कि, Xiaomi Mi 12 स्मार्टफोनचे कोडनेम 2201122C आहे आणि मॉडेल नंबर L2C आहे. तसेच हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या आगामी SM8450 चिपसेट (Snapdragon 895 SoC) सह सादर केला जाऊ शकतो. शाओमीचा हा स्मार्टफोन दोन व्हर्जन: Xiaomi Mi 12आणि Xiaomi Mi 12 Pro व्हर्जनमध्ये सादर केला जाऊ शकतो, अशी माहिती देखील समोर आली आहे.
Xiaomi Mi 12 आणि Xiaomi Mi 12 Pro या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. हे दोन्ही फ्लॅगशिप शाओमी फोन Snapdragon 895 प्रोसेसरसह सादर केले जाऊ शकतात. या फोनमध्ये 120W सुपर फास्ट चार्जिंग मिळू शकते. तसेच या फोन्समध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो, असे देखील याआधी सांगण्यात आले आहे. शाओमीच्या Mi 12 सीरिजमध्ये LTPO अडॅप्टिव रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. हा रिफ्रेश रेट 1Hz ते 120Hz दरम्यान अॅडजेस्ट केला जाऊ शकतो.