नवी दिल्ली, दि. 04 - चीनची टेक्नॉलॉजी कंपनी शाओमी उद्या(दि.5) भारतात ड्युअल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉंच करणार आहे. यासंदर्भात दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात शाओमी Mi 5X स्मार्टफोनचे लॉंचिग करण्यात येणार आहे. गीकबेंचने दिलेल्या माहितीनुसार, ड्युअल कॅमेरा शाओमी Mi 5X हा स्मार्टफोन गेल्या काही दिवसांपूर्वा चीनमध्ये लॉंच करण्यात आला होता. दरम्यान, उद्या भारतात लॉंच करण्यात येणारा शाओमी Mi A1 असून कंपनीची स्मार्टफोनची ही नवी सिरीज असणार आहे. याचबरोबर, असे सांगण्यात येत आहे की, Mi A1 दुसरा कोणताही स्मार्टफोन नसून Mi 5X या स्मार्टफोनचे नवीन व्हर्जन आहे. याचबरोबर, या स्मार्टफोनमध्ये Android One ही ऑपरेटिंग सिस्टिम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुगलने Android One ने बजेटमधील स्मार्टफोनसाठी डिझाईन केले होते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत आतापर्यंत ऑपरेटिंगचे नवे प्रोडक्टस लॉंच करण्यात आले नाही, असे समजते. गीकबेंचच्या माहितीनुसार, शाओमीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि Android 7.1.2 nougat ऑपरेटिंग सिस्टिम असणार आहे. तसेच, 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचबरोबर, 5.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि 12 मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे.
शाओमी रेडमी 4 A मॉडेलचे नवीन व्हेरियंट... शाओमी कंपनीने काही महिन्यांपूर्वी शाओमी रेडमी नोट 4 A हे मॉडेल लाँच केले होते. तेव्हा याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी इतके होते. आता याची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून यात तीन जीबी रॅम तर ३२ जीबी स्टोअरेज असेल. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. आधीच्या मॉडेलचे मूल्य 5, 999 रूपये होते. तर नवीन आवृत्तीचे मूल्य 6, 999 रूपये असून हा स्मार्टफोन उद्यापासून ग्राहकांना कंपनीच्या मी. कॉम या संकेतस्थळासह अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, टाटा क्लिक आणि पेटीएम या शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.