स्मार्ट लिविंग इव्हेंटमधून शाओमीने आज काही प्रोडक्टस भारतीय बाजारात सादर केले आहेत. यात बहुप्रतीक्षित Xiaomi Mi Band 6 चा देखील समावेश आहे. हा ब्रँड कमी किंमतीत भन्नाट फीचर्स देतो, ज्यात SpO2 सेन्सर, 30 एक्सरसाइज मोड, स्लीप ट्रॅकिंग, स्लीप ब्रीदिंग क्वालिटी इत्यादी फीचर्सचा समावेश आहे. सर्वप्रथम चीनमध्ये सादर झाल्यानंतर Mi Band 6 आता भारतीयांच्या भेटीला आला आहे.
Xiaomi Mi Band 6 ची किंमत
Xiaomi Mi Band 6 ची किंमत भारतात 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे. बँडसोबत ब्लॅक, ऑरेंज, यलो, ऑलिव्ह, इवोरी आणि ब्लू रंगाचे स्ट्रॅप उपलब्ध होती. या बँडची सेल डेट कंपनीने सांगितले नाही. याची विक्री कंपनीच्या साइट mi.com सह Amazon आणि Flipkart वरून केली जाईल.
Xiaomi Mi Band 6 चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Mi Band 6 मध्ये शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी SpO2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग मिळते. मी बॅंड 6 मधील स्लीप ट्रॅकिंग फिचर स्लीप ब्रीदिंग क्वालिटी चेकसह देण्यात आले आहे. यातील 30 एक्सरसाइज मोड पैकी 6 मोड ऑपोअप डिटेक्ट होतात.
हा फिटनेस ट्रॅकर 5 ATM पर्यंत वॉटर रेजिस्टन्ससह बाजारात आला आहे. यातील 125mAh LiPo बॅटरी सिंगल चार्जमध्ये 14 दिवसांचा बॅकअप देते, असा दावा कंपनीने केला आहे. हा बॅंड ब्लूटूथ 5.0 कनेक्टिविटीच्या माध्यमातून Android 5.0 आणि iOS 10 किंवा त्यावरील डिवाइसेसशी कनेक्ट करता येतो.
Xiaomi Mi Band 6 मध्ये 1.56-इंचाचा एज-टू-एज अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 152×486 पिक्सल आणि डेन्सिटी 326 ppi पिक्सल आहे. 450 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करणारा हा डिस्प्ले टेंपर्ड ग्लास प्रोटेक्शन आणि अँटी फिंगरप्रिंट कोटिंगसह सादर करण्यात आला आहे.